देवगड किनारी भागात ढगाळ वातावरण

देवगड किनारी भागात ढगाळ वातावरण
Published on

देवगड किनारी भागात ढगाळ वातावरण
देवगड, ता. ५ः तालुक्याच्या किनारी भागात ढगाळ वातावरण तयार होत आहे. अधूनमधून वातावरणातील उष्णतेत वाढ होऊन उकाडाही जाणवत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? अशी शक्यता वर्तवली जात होती. किनारी भागात रोज बदलत्या वातावरणाचा अनुभव स्थानिक घेत आहेत.
अलीकडे काही दिवस किनारी भागातील वातावरणात बदल जाणवत आहेत. कधी उकाडा तर कधी थंडीची लहर असते. हवेत धुलीकण दिसतात. वाऱ्याच्या दिशाही सतत बदलत असतात. त्यामुळे रोज बदलत्या वातावरणाचा अनुभव स्थानिकांना येत आहे. आज अधूनमधन किनारी भागातील वातावरण ढगाळ बनत होते. त्यामुळे अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, अजुनही अवकाळी पावसाची टांगती तलवार कायम असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com