

केमिकल्स विरहित
आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने
कोल्हापूर येथे शनिवारपासून कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर, ता. १३ ः भारताला वनौषधी व आयुर्वेदिक ही मोठी उपलब्धी मिळालेली आहे. आयुर्वेदाला भारतात मोठी परंपरा आहे. आयुर्वेदाचा वापर अनेक वर्षापासून होत आहे. मात्र मागील काही काळात शरीराला घातक अशी रसायने वापरून सौंदर्यप्रसाधने बनवली जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. याचा गंभीर परिणाम म्हणजे विविध प्रकारच्या त्वचारोग व गंभीर आजार होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने यांचे महत्त्व वाढले आहे. त्याच अनुषंगाने सकाळ-ॲग्रोवन संयुक्त शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे कोल्हापूर येथे विशेष आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने बनवण्याचे प्रशिक्षण सकाळ कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. पुण्याचे प्रसिध्द आयुर्वेदिक व ब्युटी तज्ज्ञ डॉ. कांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होणार आहे.
प्रशिक्षणात काय काय शिकण्यास मिळेल
क्रॅक क्रीम, स्क्रब, लेमन क्लीनझिंग क्रीम, ऑरेंज मसाज क्रीम, प्रीमेकप क्रीम, पिगमेंटेशन पॅक, पिंपल पॅक, आयुर्वेदिक क्लिंझिंग लोशन, ॲस्ट्रीदन्ट, स्किन फ्रेशनर, कोल्ड क्रीम, आयुर्वेदिक फेस पॅक,चेहऱ्यावरील काळे डाग पॅक, ओबोसिटी, स्टीम ऍरोमॅटिक ऑइल, तेलकट त्वचा, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळी वर्तुळे, वृक्ष त्वचा यावरती ही प्रसाधने बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय वात, पित्त, कफ या प्रवृत्तीनुसार आयुर्वेदिक सौंदर्य टिप्सही दिल्या जाणार आहेत. चहा, जेवण, नोट्स व प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार रुपये आहे.
संपर्क : ९१७५७२४३९९
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत
स्थळ : सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.