जामसंडेत ‘शौर्या तुला वंदितो’ कार्यक्रम उत्साहात

जामसंडेत ‘शौर्या तुला वंदितो’ कार्यक्रम उत्साहात

Published on

53361
जामसंडे ः येथे ‘शौर्या तुला वंदितो’ कार्यक्रम साजरा झाला.

जामसंडेत ‘शौर्या तुला वंदितो’ कार्यक्रम उत्साहात

‘सह्याद्री प्रतिष्ठान’चा पुढाकार ः सैनिकांच्या साहसाप्रती कृतज्ञता व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित ‘शौर्या तुला वंदितो’ कार्यक्रम जामसंडे येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. विविध मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था गेली १६ वर्षे अखंडपणे गड-किल्ले जतन व संवर्धनाचे कार्य करते. हे कार्य करताना विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे निवृत्त माजी सैनिक, स्वातंत्र्यसेनानी यांच्या शौर्य आणि साहसाप्रती कृतज्ञता ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संस्थेच्या विविध विभागामार्फत माजी सैनिकांसाठी ‘शौर्या तुला वंदितो’ आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाचा ‘शौर्या तुला वंदितो’ व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरच्या सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बीडवाडी (कणकवली) येथील माजी सैनिक कावले यांच्या लहान मुलांच्या टिमकडून शाळेच्या पटांगणात मल्लखांब व लाठीकाठी प्रात्यक्षिकाने झाली. माजी सैनिकांना येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या विद्यार्थिनींकडून संचलनातून मानवंदना देण्यात आली. अमर जवानांना संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते अमर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालुक्यातील १० माजी सैनिक व स्वातंत्र्यसेनानी तसेच कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सह्याद्री शौर्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संदीप भुजबळ, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, मिठबांव येथील रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव उर्फ भाई नरे, माजी सैनिक रघुनाथ धुळप, प्रकाश पुजारे, मनोहर देवधर, प्रसाद नाडकर्णी, जायाजी जोगल, अरविंद सुके, बाळकृष्ण कावले, विठ्ठल बिर्जे, पी. पी. खानविलकर, शिवशंभो सामाजिक मंडळ फोंडाघाटचे अध्यक्ष अशोक लाड, श्री दुर्गामाता मंडळ विजयदुर्गच्या सचिव सौ. आळवे, मालवण बंदर निरीक्षक गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. गोगटे, भुजबळ, गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. दुर्गसेवक सिद्धेश परब यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गसेवक दीपक करंजे यांनी आभार मानले.
--
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
समाजात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक आणि कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांतील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सह्याद्री गुणगौरव सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी गोजमगुंडे यांना विजयदुर्ग येथील दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com