बांदा मनसे शहराध्यक्षपदी नाडकर्णी, विभाग अध्यक्षपदी विष्णू वसकर

बांदा मनसे शहराध्यक्षपदी नाडकर्णी, विभाग अध्यक्षपदी विष्णू वसकर

Published on

swt431.jpg
55850
चिन्मय नाडकर्णी, विष्णू वसकर

बांदा मनसे शहराध्यक्षपदी नाडकर्णी नियुक्त
विभाग अध्यक्षपदी विष्णू वसकर; निवडीने संघटनेत नवचैतन्य
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांदा शहराध्यक्षपदी चिन्मय नाडकर्णी यांची तर बांदा विभाग अध्यक्षपदी विष्णू वसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी श्री. ठाकरे यांनी गेल्यावर्षी बरखास्त केली होती. बांदा शहरात एक युवा उद्योजक तथा पदवीधर नाडकर्णी यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन बांदा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याजवळ देण्यात आली आहे. एक सुशिक्षित चेहरा बांदा शहरात दिल्यामुळे मनसेमध्ये नवचैतन्य आले असून आगामी मिशन २०२४ मध्ये निवडणुकांमध्ये मनसे जोमाने उतरेल, असे मत सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी मनसेचे सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, कुडाळ विधानसभा सचिव सचिन सावंत, सावंतवाडी मनसे संपर्क अध्यक्ष अमित नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष केतन सावंत, वेंगुर्ले माजी तालुकाध्यक्ष सनी बागकर, राकेश परब, सतीश आकेरकर, अभिमन्यू गावडे, महादेव तांडेल, राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, विष्णू वसकर, काशीराम गावडे, विजय बांदेकर, अतुल केसरकर, साहिल तळकटकर, पांडुरंग बुगडे, अमोल नाईक, स्नेहा प्रशांत कुडाळकर, मंदार चोपडेकर, सहदेव फोडनाईक, अनिकेत दळवी, हर्षद कांबळे, विशाल दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com