जिल्ह्यातील पत्रकारितेत सामान्यांचे प्रतिनिधित्व

जिल्ह्यातील पत्रकारितेत सामान्यांचे प्रतिनिधित्व

56243
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.


जिल्ह्यातील पत्रकारितेत सामान्यांचे प्रतिनिधित्व

प्रांताधिकारी पानवेकर : सिंधुदुर्ग प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः जिल्ह्यातील पत्रकारिता ही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत होती तशीच आहे. पत्रकारांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून, हा वसा असाच कायम ठेवावा. येथील पत्रकार सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात, असे गौरवोद्गार सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी काढले.
पत्रकार दिनानिमित्त सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रेस क्लबच्या वतीने घरोघरी वृत्तपत्र वितरित करणाऱ्या सहा जणांना थंडीसाठी सुरक्षा स्वेटर प्रदान करण्यात आली.
भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमसावंत भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण महिला उपाध्यक्षा अर्चना घारे-परब, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, गजानन नाटेकर, पुंडलिक दळवी, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, प्रेस क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, हेमंत खानोलकर, अरुण वझे उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे. असेच काम सर्वांनी करावे असे आवाहन यावेळी पानवेकर यांनी केले.
लखमसावंत यांनी सावंतवाडीतील पत्रकार हे राजकारणात नव्याने येणाऱ्यांना संधी देत असतात, हे बघून बरे वाटते, अशा शब्दांत कौतुक केले. साळगावकर यांनी आपण प्रेस क्लबच्या पहिल्या दिवसापासून सोबत असून, ही सोबत अशीच कायम राहील, असे सांगितले. अशोक दळवी यांनी पत्रकारांना धन्यवाद देतना सर्वांनी मिळून यापुढेही विकासकामांत सहकार्य करावे, असे आवाहन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगवले, अर्चना घारे, अभिमन्यू लोंढे, सीताराम गावडे यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनंत जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला पत्रकार उमेश सावंत, राकेश परब, संजय भाईप, लक्ष्मण आढाव, संदेश पाटील, आनंद धोंड, शैलेश मयेकर, मकरंद मेस्त्री, मदन मुरकर, संदेश कारिवडेकर, नयनेश गावडे, संजय पि॓ळणकर, संदीप राऊळ, विशाल सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com