-खैरवाढीसाठी कोकण कृषी विद्यापीठस्तरावर प्रयत्न हवेत

-खैरवाढीसाठी कोकण कृषी विद्यापीठस्तरावर प्रयत्न हवेत

९ (पान ५ साठी)

खैरवाढीसाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न हवेत

उद्योजक पाकळेंची मागणी ; कुलगुरुंचे आश्वासन

सावर्डे, ता. ६ ः कोकणात खासगी मालकीच्या जंगलात विपुल प्रमाणात आढळणारी खैर वनस्पती उत्पन्नातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत आहे. सद्यःस्थितीत हा वृक्ष वणव्याचा भक्षक झाला आहे. त्यामुळे या वृक्षाच्या वाढीवर परिणाम होत आहे. जंगलात बी पडल्यावर स्वयंम रूजून येणार हे झाड खूप किफायतीशीर असले तरी त्याची वणव्यामुळे वाढ खुंटत आहे. खैर वृक्षवाढीसाठी कोकण कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी प्रसिद्ध सुभाष पाकळे ग्रुप उद्योजक सचिन पाकळे, संजय पाकळे यांनी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांच्याकडे केली आहे.
कोकणात खैर वनस्पती विपुल प्रमाणात आढळून येते. खैर चंदन वृक्षाप्रमाणे किकायतशीर असून सदर खैरपिकाची झपाट्याने वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. खैर वनस्पतीपासून कात उत्पादित होतो तसेच काताच्या पावडरचा लेदरसाठी, कातापासून तयार होणारे टेनिन या उत्पादनाला परदेशात मोठी मागणी आहे. या खैराच्या झाडावर प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादित माल मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होत आहे.
खैर वनस्पतीची कोकणात मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास सदर लागवडीस उत्तेजन दिल्यास कोकणचा शेतकरी आर्थिकदृष्टीने संपन्न होईल. चंदन वृक्षाप्रमाणे खैर वनस्पतीचा वनशेतीत समाविष्ट करून सदर खैर वनस्पतीची वाढ होण्यासाठी नवतंत्रज्ञाचा वापर करून शोध घ्यावा. हे नवतंत्र विकसित झाले आणि कोकणातील जंगलात लागणारे आग वणवे थांबवल्यास तसे कायदे केल्यास कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होईल. पाकळे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे, खैर पिकाबाबत नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून या पिकाचे भविष्यातील महत्व लक्षात घेऊन विद्यापीठ स्तरावर प्रयत्न केले जातील. तशा सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्याचे कुलगुरू भावे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com