-खंडाळ्यातील निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

-खंडाळ्यातील निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

३१ (पान ५ साठी, आवश्यकत)


-rat६p३६.jpg-
P२४M५६२४९
रत्नागिरी ः किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांला बक्षीस देताना बाबू पाटील.
-----------

खंडाळा निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

रत्नागिरी, ता. ०६ : तालुक्यातील खंडाळा येथे सिंधुरत्न समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बाबूशेठ मित्रमंडळ, शिवसेना वाटद जिल्हा परिषद गट आणि शिक्षण विभागातर्फे आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण खंडाळा हायस्कूलमध्ये झाला.
स्पर्धा पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या गटात विविध विषयांवर शाळास्तरांवर घेण्यात आली होती. त्यातील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि सन्मानपत्र देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षणविस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख स्मिता मांजरेकर, राणे, अरूण जाधव, अरविंद महाकाळ, एकनाथ महाकाळ यांच्या पुढाकाराने वाटद जिल्हा परिषद गटातील वाटद, संदखोल, जांभारी, कळझोंडी या केंद्रातील शाळा सहभागी झाल्या होत्या. तब्बल २०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस समारंभाला तालुका संघटक शरद चव्हाण, मेघना पाष्टे, उद्योजक प्रमोद घाटगे, उद्योजक विनोद चौघुले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com