‘हुंड्यासाठी सासरी छळ;
तक्रार करूनही दुर्लक्ष’

‘हुंड्यासाठी सासरी छळ; तक्रार करूनही दुर्लक्ष’

56300
सिंधुदुर्गनगरी ः श्रुती वरसकर यांनी शनिवारी उपोषण केले.

‘हुंड्यासाठी सासरी छळ;
तक्रार करूनही दुर्लक्ष’

विवाहितेचा दावा ः सिंधुदुर्गनगरीत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः दाभोली (ता. वेंगुर्ले) येथील माहेरवाशीण असलेल्या श्रुती वरसकर या विवाहितेने हुंड्यासाठी पती, सासू, दीर आणि नणंद त्रास देत असून, यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही ते दखल घेत नसल्याचा आरोप करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडले. जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत निवेदनही दिले.
निवेदनात वरसकर यांनी म्हटले आहे की, आपला विवाह २४ डिसेंबर २०१६ ला झाला. तेव्हापासून आपल्याकडे सासू, पती, दीर आणि नणंद यांनी वारंवार हुंडा मागण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून उपाशी ठेवले. आपल्याला मारहाणही केली. इतके सर्व होऊनही आपण संसार करत असताना नणंदेने गैरसमज पसरवून आमच्या पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. नणंदेने दबावाचा वापर करीत हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. एक महिला असूनही नणंद माझा संसार उद्ध्वस्त करीत माझ्यावर अत्याचार करीत आहे. हुंड्यासाठी आपला केव्हाही बळी जाऊ शकतो, या भीतीने मी आपण सध्या माहेरी राहत आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडले. संबंधितांनी मानसिक, शारीरिक त्रास देऊन उपाशी ठेवत मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com