सणांमुळे सामाजिक सलोखा कायम

सणांमुळे सामाजिक सलोखा कायम

56316
देवगड : येथील व्याख्यानमालेत धनश्री लेले यांचा सन्मान करण्यात आला. (छायाचित्र : संतोष कुळकर्णी)

सणांमुळे सामाजिक सलोखा कायम

धनश्री लेले ः देवगडमध्ये व्याख्यानमालेचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ : ‘ऋषी आणि कृषी’ संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. म्हणूनच हिला ‘ज्ञानाची आणि धानाची’ संस्कृती असेही म्हटले जाते. सणांमध्ये समाज बांधून ठेवण्याची ताकद असते. कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे, असे मत व्याख्यात्या धनश्री लेले (ठाणे) यांनी येथे व्यक्त केले. भारतीय संस्कृती आणि त्याच्या रचनेविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
येथील उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धक मंडळ आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ, जामसंडेच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचा समारोप करताना धनश्री लेले या ‘सण आणि संस्कृती’ विषयावर बोलत होत्या. आयोजकांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर माजी आमदार अॅड. अजित गोगटे, चारुदत्त सोमण, प्रमोद जोशी, बर्वे ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक, सचिन खवळे, उत्तरा जोशी, अयोध्याप्रसाद गावकर, ग्रंथपाल प्रशांत बांदकर आदी उपस्थित होते. यावेळी लेले यांनी भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्त्व, सणांची निर्मिती आणि त्याची रचना याविषयी सविस्तर माहिती दिली. कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. अचेतनाला सचेतन करण्याची आपली संस्कृती आहे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक सण असतात, असे सांगितले. सागर कर्णिक यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरा जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय केला. प्रांजली कानेटकर हिने ‘वंदे मातरम्’ सादर केले. प्रमोद जोशी यांनी प्रासंगिक कविता सादर केली.
.....................
चौकट
सण, संस्कृती समजून घ्या
कुटुंब व्यवस्था हा देखील भारतीय संस्कृतीचा पाया आहे. सणांना संस्कृतीने एक अधिष्ठान दिले आहे. आपली सण आणि संस्कृती समजून घेतली पाहिजे, असेही धनश्री लेले यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com