

swt२५१७.jpg
60689
तळवडे : रस्सीखेच स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना प्रथमेश तेली.
रस्सीखेच स्पर्धेत
तळवडे संघ विजेता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः तळवडे येथे भाजयुमो आयोजित नमो चषक २०२४ जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाना गावडे मित्रमंडळ, तळवडे संघाने विजेतेपद पटकावले. सिद्धिविनायक राईवाडी कुडाळ संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही स्पर्धा शेवटच्या क्षणी रंगतदार ठरली. जिल्ह्यातून एकापेक्षा एक सरस संघ या स्पर्धेत सहभागी झाले. अखेरच्या क्षणी नाना गावडे मित्रमंडळ, तळवडे यांनी विजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांक सिध्देश्वर डाळकर संघ तळवडे व चौथा क्रमांक सिध्देश्वर तळवडे संघाने पटकावला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, प्रमोद गावडे, निशांत तोरसकर, दादा परब, सुशांत गावडे, विकास गावडे, किशोर सोन्सूरकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.