stone art
stone artsakal

दगडी मूर्ती तासताना...

अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि मूर्तीकाराने घडविलेल्या मूर्तीचे सर्वांनी कौतुक केले. खरे तर एकाच संकल्पनेच्या तीन मुर्त्या घडवून त्यापैकी एक निवडून त्या मूर्तीची स्थापना गर्भगृहात करताना इतरही दोन भिन्न शैलीच्या मूर्तींची घडण लोकांसमोर आली.

अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि मूर्तीकाराने घडविलेल्या मूर्तीचे सर्वांनी कौतुक केले. खरे तर एकाच संकल्पनेच्या तीन मुर्त्या घडवून त्यापैकी एक निवडून त्या मूर्तीची स्थापना गर्भगृहात करताना इतरही दोन भिन्न शैलीच्या मूर्तींची घडण लोकांसमोर आली.

त्या मूर्ती पाहताना लक्षात येते की भारतीय शिल्पकलेचा वारसा किती समृद्ध आहे. दगडातून देवत्व साकारताना मनातील सर्व श्रद्धायुक्त भाव आपल्या कामात ओतले तरच दगडातील प्रसन्न लाघव दृष्टीस येते, असे म्हटले तर ते खोटे ठरू नये.

‘छिन्नी हातोड्याचे घाव, मग येई देवपण’ असे जे म्हटले जाते, ते याचसाठी की प्रचंड विवेकाने आणि तेवढ्याच हळुवार मायेने जर कठीण घन वस्तूवर आघात केले तर त्यातून पूज्यनीय दैवत घडू शकते.

हे दगड आणि माणूस, या दोहोंसाठी लागू होते. शिल्प घडविण्याची ही कला प्राचीन काळापासून चालत आलेली असली तरी सध्याच्या विज्ञान युगात तंत्रज्ञानाची मदत त्यासाठी घेतली जाते. मात्र तंत्र कितीही विकसित झाले तरी ते वापरण्याचे कसब किती अफलातून आहे, त्यावरून दगडाचे मनमोहक देखलेपण प्रत्ययास येते.

- संतोष गोणबरे, चिपळूण

एखादा शिल्पकार दगडापासून मूर्ति बनवत असता कल्पना, विज्ञान, गणित, परिश्रम, समर्पण, संयम आणि श्रद्धा या गोष्टींना पहिल्यांदा आत्मसात करतो आणि मग त्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण होते. सर्वात आधी त्या मूर्तिची कल्पना सुचणे ही अत्यंत महत्वाची पायरी आहे.

त्यासाठी वैचारीक कक्षेच्या बाहेर जाऊन नवीन कल्पनेला जन्म देणे गरजेचे असते. त्यानंतर कल्पनेला प्रत्यक्षात घडवण्यासाठी अवगत करावे लागते ते शस्त्र, शास्त्र आणि प्रमाण. ज्या दगडापासून शिल्पं बनवायचे तो दगड, तांत्रिक साहित्य वापरण्यासाठी लागणारे कौशल्य,

आवश्यक तो सराव, प्रमाणांची गणितीय सूत्रे यांचा आधी अभ्यास करून मगच मूर्ती घडविण्याची सुरुवात होते. असे समजले जाते की वेरूळ येथील कैलास मंदिर कोरताना १८ वर्षांत अंदाजे ४,००,००० टन दगड फोडला गेला आणि तोही फक्त छिन्नी व हातोडीने.

शिल्पकला म्हणजे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. भारतीय शिल्प शैलीवरून ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते.

मूर्ती वेगवेगळ्या आसनात बसविण्याच्या अथवा उभे राहण्याच्या पद्धतीला शैली अथवा डौल म्हणतात. असतात. आसनपर्यक, अर्धपर्यक, आलीढ, प्रत्यालीढ, पद्म, वीर इत्यादी शैली विकसित असून शरीर ठेवण समभंग, त्रिभंग, अतिभंग ह्यापैकी एक असते.


दगडावर कोरीव काम करण्याच्या पद्धतीला तक्षण म्हणतात. ख्रिस्त पूर्व काळापासून भारतात दगडी कोरीवकाम विकसित झाल्याचे दिसून येते. यासाठी काळा पाषाण, संगमरवर, शाळीग्राम, काही ठिकाणी ग्रॅनाईड तर कोकणात चक्क जांभा दगड वापरला जातो.

भारतीय कारागीर दगडी कोरीवकामासाठी अगदी साधी हत्यारे वापरतो. खाणीतून आणलेला दगड प्रथम तो साफ करून घेतो आणि आपल्या छिन्नी, हातोडीने छिलून व त्याचा पृष्टभाग गुळगुळीत करून त्याला हवा तो आकार आणतो.

यानंतर त्या दगडावर हव्या त्या नक्षीकामाची अथवा शिल्पाकृतीची आकृती काढली जाते. त्यासाठी कंपास व गुण्याचा उपयोग केला जातो. यानंतर निरनिराळ्या रुंदीच्या व जाडीच्या छिन्न्या आणि हातोडी घेऊन कोरण सुरू होते.

हातोडा, छिन्नी, दातेरी पाते, सामता व कसणी, ऐरण, गुण्या, ओळंबा, पातळीदर्शक फलक, मोजपट्टी, कर्कट, खतावणी, व्यासमापक, छोटी कुर्‍हाड, वाकस, अंबूर, विभाजक, कानस, पोगर, ठोकणी किंवा मोगरा इत्यादी मूलभूत हत्यारे यासाठी उपयुक्त ठरतात.

हातोड्याचे गोलक हातोडी, बेचकी हातोडी, पाचरमुखी हातोडी, घण, तांबटी हातोडी, लाकडी हातोडी, कातडी हातोडी, पाथरवटी हातोडी एवढे बहुविध प्रकार होतात. तासणीसाठी छिन्नी, कानस, खर्ड्या, धातुकरवत, अंतःसूत्रक, पेचपाटी, लोहारी छिन्नी, मुद्राकारक, नळीकर्तक तर मापन आणि रेखन करण्यासाठी पोलादी मोजपट्टी,

अंतर्व्यासमापक, बहिर्व्यासमापक, रेखनबिंदू पोगर, कंपास, गिरपट्टी, जेनी कॅलिपर, रेखन ठोकळा, आधारकोन ठोकळा, व्ही-ठोकळा, सपाट पाट, खटावणी, घडीची लाकडी मोजपट्टी, पोलादी रेखणी, संयोगी गुण्या, खोलीमापक, बहिर्सूक्ष्ममापक,

अंतर्सूक्ष्ममापक, व्हर्नियर व्यासमापक, उंचीमापक, घंटी केंद्र पोगर इत्यादी वेगवेगळी हत्यारे वापरावी लागतात. छिद्रांवर काम करण्यासाठी पिळाचा छिद्रक, हात छिद्रक, रॅचेट छिद्रक, छिद्र तासणी, डोललमिट, स्क्रू गिरमिट वापरण्याचे कसब कलाकाराकडे असणे गरजेचे असते. एवढे सर्व झाल्यावर मूर्तीचे प्रमाणभूत परीक्षण करण्यासाठी सरळकड पट्टी,

तबकडीमापक निर्देशक, कोन परीक्षक, गुडदी मापक, झटिती मापक, ज्या-गज, पाणसळ चौकट, फटमापक, स्क्रू अंतरालमापक, त्रिज्यामापक, सूक्ष्मी पाणसळ, प्रकाशीय मापक, केंद्रमापक वापरून मूर्तीचे परीक्षण करून ती मूर्ती योग्य त्या आकार प्रमाणात आणावी लागते.


कोकणातील कर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. दगडी शिल्पांचे तंत्र आणि विकास यांचा उगम शुंग आणि सातवाहन काळात सापडतो. इ. स. पू. पहिले व दुसरे शतक यांदरम्यान भारतीय शैलशिल्प अनेकविध जातींच्या पाषाणात कोरले गेले आहे.

विविध दर्जाचे आणि पोतांचे वालुकाश्म, शिस्ट सारखे ठिसूळ त्यांचे खडक, सह्याद्रीच्या रांगामधील काळा अग्निजन्य खडक, संगमरवर, जांभा दगड यांसारख्या हाती येईल त्या दगडांशी भारतीय शिल्पींची छिन्नी भिडली आहे. अतिशय भरड पाषाणालाही शिल्पकारांनी दैवी सौंदर्य बहाल केले आहे.

शिल्पकार दगडापासून मूर्ती बनवत नसतो तर त्याला दगडातून देव घडवावा लागतो आणि ह्या प्रक्रियेत वरील गुणधार्मांना आत्मसात करत करत खरंतर त्या मनुष्यप्राण्यातील माणूस घडत जातो. हीच खरी मूर्तीची पूजा होय! ह्याच पूजेतून दगडातून देव घडवता घडवता माणसातील आत्मा जो देवाचा अंश तो जागृत होतो.

सहाव्या शतकानंतर दख्खनच्या डोंगराळ मुलखात आणि सुदूर दक्षिणेकडे शिल्पकला झपाट्याने विकसित झाली. महाबलीपुरचे पल्लवकालीन शिल्पपट, ऐहोळे आणि पट्टदकलची चालुक्यकालीन मंदिरे, वेरूळचे कैलास लेणे, तंजावरचे चोलकालीन बृहदीश्वर मंदिर आणि अप्रतिम धातुशिल्पे अशी भव्य निर्मिती या काळात झाली.

उत्तरेत खजुराहो, पूर्वेकडे कोणार्क, भुवनेश्वर इत्यादी ठिकाणची शिल्पे अतिशय महत्त्वाची आहेत. रामकिंकर बैज, देवीप्रसाद रायचौधरी, महेद्र पंड्या, बलबीर कट्ट, लतिका कट्ट, ध्रुव मिस्त्री असे काही प्रतिभावंत कलावंत आधुनिक भारतीय शिल्पेतिहासात आढळतात.

सध्या शिल्पकलेला व्यावसायिकता आली आहे आणि ती आवश्यक देखील आहे. या कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यास कलेच्या प्रांतात लाक्षणीय कोरीव आणि घडीव काम करता येईल. त्यातून आर्थिक आणि सामाजिक तसेच व्यावसायिक उन्नयन शक्य आहे.

टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडाला ही देवपण येत नाही, असे कायमच म्हटले जाते, तसेच कष्टाचे घाव सोसल्याशिवाय माणूसपण देखील प्राप्त होत नाही. गरज आहे, ती स्वत:ला आधी छिणून घेण्याची..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com