Vinayak Raut Ratnagiri Assembly Constituency
Vinayak Raut Ratnagiri Assembly Constituencyesakal

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंना लाथाडणाऱ्या गद्दारांचा विधानसभा निवडणुकीत शेवट करणार; खासदार राऊतांचा घणाघात

येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे.
Summary

आमदार राजन साळवी संघटनेशी प्रामाणिक राहिले. त्यांची चौकशी लावली. तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न झाला तरी साळवी हेच पुन्हा आमदार असतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी/पावस : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात (Ratnagiri Assembly Constituency) पक्षांतराचा गाढा अभ्यास असलेले उपरे आमच्या कार्यकर्त्यांना गाडायला निघाले आहेत. यांचा शिवसेनेत जन्म कधी झाला. या गद्दारांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना (Shiv Sena) शिकवायची. ज्यांनी ठाकरेंना लाथाडले त्यांचा राजकीय शेवट याच विधानसभा निवडणुकीत यांच मतदार संघात करायचा आहे, असा निर्धार खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला.

Vinayak Raut Ratnagiri Assembly Constituency
कोल्हापूर शहराची लवकरच हद्दवाढ? अजितदादांनी हद्दवाढीचा चेंडू पुन्हा ढकलला स्थानिक नेत्यांच्या कोर्टात!

तुम्ही उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पावस जिल्हा परिषद गटात पहिला मेळावा घेऊन प्रचाराचा आरंभ केला. या वेळी मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

Vinayak Raut Ratnagiri Assembly Constituency
जिद्द असावी तर अशी! रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी तब्बल साडेबारा हजार फूट उंचीवरील 'केदारकंठ' शिखर केलं सर

राऊत म्हणाले, सत्तेच्या जोरावर यांची मस्ती सुरू आहे; मात्र यांच्या राजसत्तेला गाडून टाकून भाजपला बाहेर खेचून काढू. आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ आहे. फक्त आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहचलो पाहिजे. जनतेलाही यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे; मात्र त्यांना संधी मिळत नाही. त्यांनी हिम्मत असेल तर पालिका, जिल्हा परिषद, महानगर पालिकांच्या निवडणुका लावाव्यात.

जनताच यांना गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आमदार राजन साळवी संघटनेशी प्रामाणिक राहिले. त्यांची चौकशी लावली. तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न झाला तरी साळवी हेच पुन्हा आमदार असतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आमचा विजय निश्चत असल्याचा दावा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला. या वेळी राजेंद्र महाडिक, विलास चाळके यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.

Vinayak Raut Ratnagiri Assembly Constituency
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

माझ्यात काय बदल झाला का?

मी दोनवेळा खासदार झालो, माझ्यात काय बदल झाला का? तुम्हीच सांगा. माझ्या संपत्तीत एक इंच जरी जागा वाढली असेल, मालमत्ता वाढली असेल, मी टक्केवारी घेतली असेल तर एक पुरावा द्या. माझ्यावर आरोप करायला यांना संधीच नाही. विरोधकांची अशी अवस्था झाली आहे की, माझ्या विरोधात उभा करायला यांना उमेदवार मिळत नाही. असा एकही चेहरा यांच्याकडे नाही. त्यांना माझे सांगणे आहे, आमच्या नादाला लागू नका, येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला गाडून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com