कणकवलीत ११ फेब्रुवारीला सायकल मॅरेथॉन
61857
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत सायकल मॅरेथॉनबाबत रूपेश तेली यांनी माहिती दिली. यावेळी मकरंद वायंगणकर, कैलास सावंत, संजय बिडये, विष्णू रामागडे उपस्थित होते.
कणकवलीत ११ फेब्रुवारीला सायकल मॅरेथॉन
कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे आयोजन; विविध बक्षिसे
कणकवली, ता.३१ : कनक रायडर्स सायकल क्लब कणकवली, सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्यावतीने कणकवलीत ११ फेब्रुवारीला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४’ सायकल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पंचवीस किलोमिटर, पन्नास किलोमिटर आणि १०० किलोमिटर, अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी शर्ट दिला जाणार आहे, अशी माहिती आज कनक रायडर्सच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव रुपेश तेली यांनी येथील पत्रकार परिषदेत सायकल मॅरेथॉनची माहिती दिली. यावेळी मकरंद वायंगणकर, कैलास सावंत, संजय बिडये, विष्णू रामा गडे, दीपक शिंदे, प्रसाद बुचडे, सुमित राणे, रोशन राणे आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, ‘‘‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३’ ही सायक्लोथॉन २५ किलोमीटर, ५० किलोमीटर व १०० किलोमीटर अशा गटात होईल. यात यजमान सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील सायकलपटू सहभागी होणार आहेत. या सायक्लोथॉनमध्ये २५ किलोमीटर गटात स्पर्धकांना कणकवली ते श्री देव रवळनाथ मंदिर ते करंजे गाव आणि तेथून परत असा प्रवास असेल. ५० किलोमीटर गटासाठी कणकवली ते करंजे मार्गे मराठे कॉलेज फोंडा ते परत, असा प्रवास आहे. तर १०० किलोमीटर गटासाठी कणकवली करंजे मराठे कॉलेज फोंडाघाट ते नांदगाव, शिरगाव तळेबाजार तेथून परत आयनल फाटा चाफेड, भरणी, तरंदळे मार्गे कणकवली, असा मार्ग आहे. यामध्ये २५ किलोमीटर दोन तास, ५० किलोमीटर चार तास व १०० किलोमीटरसाठी सात तास, असा वेळ निश्चित केला आहे. नियोजित मार्गावर क्लबतर्फे सपोर्ट व्हेईकल, रुग्णवाहिका, सोबत तज्ज्ञ सायकलस्वार अशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरून येणारे स्पर्धक सहभागी असतीलच; पण आपल्या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त सायकलस्वारांनी या सायक्लोथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच इच्छुकांनी https://forms.gle/८c४५m५qmiL२८b१EUA या लिंकवर अर्ज भरावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.