चिपळूण : ऑरबिट स्पर्धेत १६१ विद्यार्थी सहभागी

चिपळूण : ऑरबिट स्पर्धेत १६१ विद्यार्थी सहभागी

rat12p10.jpg ः
64475
चिपळूण : केम फेस्ट २०२३ ऑरबिट या स्पर्धेचे उद्घाटन करताना मंगेश तांबे, सोबत प्राचार्य डॉ. माधव बापट.

ऑरबिट स्पर्धेत १६१ विद्यार्थी सहभागी
महाविद्यालयांसाठी आयोजन ; पोस्टर, रांगोळी, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : डी. बी. जे. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व आयक्युएसी यांच्यावतीने आयोजित केम फेस्ट ऑरबिट या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पोस्टर, रांगोळी, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. जिल्ह्यातील विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण १६१ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट उपस्थित होते. दापोली अर्बन बँक कॉलेजचे प्रा. संतोष मराठे, प्रा. सुरेश जगदाळे, प्रा. उदय बामणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केम-पोस्टर या स्पर्धेत साहिल खेराडे (डीबीजे कॉलेज, चिपळूण), अक्सा पावसकर (आयसीएस, खेड), रूपाली अघव व प्राजक्ता परदळे (डीबीजे कॉलेज) यांनी यश मिळवले. रांगोळी स्पर्धेत स्नेहा शिंदे व जान्हवी शिंदे (ज्यु. कॉलेज, गुहागर), साक्षी चव्हाण व सिद्धी लाखण, भाग्यश्री गुरव व महालक्ष्मी शिंदे यांनी यश संपादन केले. प्रोजेक्ट स्पर्धेत सृष्टी वाघे व साईराज धाडवे, मिसबाह मुकादम व अल्फिया अलवारे (डीबीजे कॉलेज), अमिरा दळवी व सदाफ तांबे (आयसीएस कॉलेज, खेड) यांनी यश मिळवले. शब्दकोडे स्पर्धत रोहित कदम (डीबीजे कॉलेज), तनीश शिरगावकर, आदित्य लवेकर यांनी यश मिळवले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत रोहित कदम व क्षितीज पाटोळे (डीबीजे कॉलेज,चिपळूण), शगुफ्ता गोलंदाज व आफिया इनामदार (डीबीजे कॉलेज, चिपळूण) यांनी यश संपादन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com