

67031
जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात
किशोर काळे ः पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची बुधवारी पडताळणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः जिल्हा परिषदेची विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण १७ संवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यातील १३ संवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. १० संवर्गाची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या दहा संवर्गातील पात्र उमेदवारांना बुधवारी (ता.२८) कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी दिली.
राज्याने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेत ३३४ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण १७ संवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक एक, औषध निर्माण अधिकारी ११, बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील स्थापत्य म्हणून २९ कनिष्ठ अभियंता, दोन विद्युत कनिष्ठ अभियंता, दोन कनिष्ठ लेखा अधिकारी, चार कनिष्ठ सहाय्यक लेखा, एक तारतंत्री, १८ पशुधन पर्यवेक्षक, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, चार वरिष्ठ सहाय्यक, सात वरिष्ठ सहाय्यक लेखा, तीन कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील २७ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ५५ पुरुष आरोग्य सेवक, १२१ आरोग्य परिचारिका, ४५ कंत्राटी ग्रामसेवक, दोन मुख्यासेविका-पर्यवेक्षिका या पदांचा समावेश आहे. यातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील स्थापत्य कनिष्ठ अभियंता, विद्युत कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या १३ संवर्गांची लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. यातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील स्थापत्य कनिष्ठ अभियंता, विद्युत कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक या दहा संवर्गांची निवड यादी जाहीर केली आहे. या जाहीर झालेल्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी २८ ला बोलाविले आहे. परीक्षा झालेल्या वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची अद्याप निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. पुरुष आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्यासेविका-पर्यवेक्षिका या पदांसाठीची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही. यातील मुख्यासेविका-पर्यवेक्षिका या दोन पदांसाठी १०२ अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा २९ ला जिल्ह्यातील तीन केंद्रांवर होणार आहे.
------------------
कोट
जिल्हा परिषदेच्या १७ संवर्गाच्या ३३४ पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. यासाठी एकूण १६ हजार २८७ उमेदवारांनी अर्ज केले होते. आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे, परीक्षा केंद्र निश्चित करणे, परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे. आता शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. मार्च २०२४ पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
- किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.