रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा
Published on

मिरकरवाडा येथे
घरफोडीची घटना
रत्नागिरीः मिरकरवाडा येथे घरफोडी करून ३ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) रात्री एक ते सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या त्यांचा भाऊ नाजीम हसनमियॉ मजगावकर (रा. खडप मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या. त्या मुदतीत चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे व खोलीच्या दरवाजाचे कुलूप हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १५ हजार ग्रॅम वजनाचे मोठे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजाराचे ५ ग्रॅमचे मंगळसुत्र, १० हजाराची ५ ग्रॅमची सोन्याची चैन आणि ३ लाख २५ हजार रुपये रोख असा ३ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविला.
------------
कुरिअर एक्झिक्युटीव्हचे
नाव वापरुन फसवणूक
रत्नागिरीः एका कुरीअर एक्झिक्युटीव्हच्या नावाचा वापर करुन २ लाख ५१ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ७ फेब्रुवारी २०२४ दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रा. डॉ. सुधीर गंगाधर अकोजवार यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून एका कुरीयर एक्झिक्युटीव्हच्या नावाचा वापर करुन त्या आधारे फिर्यांदी यांच्या बॅंक खात्यातून रक्कम ट्रान्सफर करुन घेऊन फिर्यादी अकोजवार यांची २ लाख ५१ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अकोजवार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
-------------
मारहाणप्रकरणी
अकरा जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः मुलाला शाळेत सोडण्यासाठी सोमेश्वर बसस्टॉपवर गेलेल्या फिर्यादीला दहा जणांनी मारहाण केली. ग्रामीण पोलिसात संशयित अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निसार महम्मद हुश्ये, आसिफ इकबाल साखरकर, बशीर इकबाल साखरकर, आरमान सैफ नाईक, तैरीण सैफ नाईक, तेहसीन निसार हुश्ये, यास्मीन इकबाल साखरकर, अबिदा फणसोपकर, शाहीद निसार हुश्ये, इकबाल साखरकर, इमरान सैफ नाईक (सर्व रा. सोमेश्वर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २४) पावणेबाराच्या सुमारास सोमेश्वर बस स्टॉप येथे घडली. या प्रकरणी वसीम वस्ता यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.
-------------
नेपाळी खलाशाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः राजिवडा येथे बोटीवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नेपाळी खलाशी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सुरेश मोतीलाल डंगोरा (वय ३३, रा. राजिवडा जेटी मुळ ः कैलाली, नेपाळ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंगोरा शनिवारी (ता. २४) रात्री आठच्या सुमारास जेवण करुन अलमर्यम बोटीवर झोपला होता. रविवारी सकाळी उठला नाही म्हणून त्याच्या सोबत असलेल्या आयुष चौधरी या खलाशाने बोट मालकाला सांगितले. त्यांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डंगोरा यास तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com