Konkan Politics
Konkan Politicsesakal

Loksabha Election : कोकणात भाजपकडून मित्रपक्षांची कोंडी; मुख्यमंत्री शिंदे गटाकडूनही जोरदार फिल्डिंग

रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघातल पेण हा एकच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.
Summary

महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी कोंडी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.

चिपळूण : कोकणात मित्रपक्षांची कोंडी करण्याचे धोरण भाजपने (BJP) स्वीकारले आहे. रायगडपाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे रायगडमधून राष्ट्रवादीची, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील इतरभागांच्या तुलनेत कोकणात भाजपची ताकद कमी आहे. रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघातल पेण हा एकच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नितेश राणे हे भाजपचे एकमेव आमदार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी आहे, मात्र तरीही दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितल्याने रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

Konkan Politics
Loksabha Election : उदयनराजेंनी वाढदिनी फुंकले रणशिंग; लोकसभेला जनतेतून निवडून जाण्याची व्यक्त केली इच्छा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आता भाजपने दावा सांगितला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे निर्देश दिले आहेत. राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही, मात्र पक्षाचा आदेश आला तर सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची चर्चा आहे.

Konkan Politics
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं 10 टक्के आरक्षण दिलं - एकनाथ शिंदे

काही दिवसांपूर्वी ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची चिन्ह दिसत आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने तो शिंदे गटाला मिळावा, अशी अपेक्षा पक्षपदाधिकाऱ्यांची होती. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तशी मोर्चेबांधणी त्यांनी सुरू केली आहे, मात्र नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसतेे. त्यामुळे हा मतदारसंघ मित्रपक्षाला देण्याची भाजपची तयारी नसल्याचे दिसून येत आहे.

Konkan Politics
Marathi Bhasha Din : सीमाभागात मराठीसाठी कार्यरत संस्थांना हवे पाठबळ; महाराष्ट्र सरकारच्या 'या' निर्णयाची अंमलबजावणीच नाही

रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत, तरीही भाजपने शेकापमधून आलेल्या धैर्यशील पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेऊन निवडणूक तयारीही सुरू केली आहे. या मेळाव्यामधून भाजपकडून सुनील तटकरे यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असावा, सुनील तटकरे यांना उमेदवारी नकोच असा सूर भाजपने लावण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी कोंडी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. मित्र पक्षातील फूट, बदललेली राजकीय परिस्थिती यावर बोट ठेवून भाजपने कोकणातील दोन्ही मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरवात केली आहे. यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोन्ही मित्र पक्ष दुखावले जाण्याची शक्यता आहे.

Konkan Politics
खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिकांची राजकीय एन्ट्री; कोल्हापुरात झळकले बॅनर, विधानसभा लढवणार?

नैसर्गिक न्‍यायानुसार ज्‍या मतदारसंघात ज्‍या पक्षाचा खासदार आहे, त्‍या ठिकाणी त्‍याच पक्षाचा खासदार निवडून आला असेल त्‍याच पक्षाचा दावा राहील, असे युतीच्या जागा वाटपाचे सूत्र असते. जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील.

-उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com