Turtle Conservation Campaign
Turtle Conservation Campaignesakal

Olive Ridley Turtle : महिन्यात समुद्रात झेपावली 683 कासवांची पिल्ले; कासवमित्रांकडून 180 घरट्यांचं संरक्षण

कासव संवर्धनाच्यादृष्टीने (Turtle Conservation) वनविभागाने (Forest Department) भरीव काम केल्याचे पुढे आले आहे.
Summary

कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासव (Olive Ridley Turtle) येतात.

रत्नागिरी : कासव संवर्धनाच्यादृष्टीने (Turtle Conservation) वनविभागाने (Forest Department) भरीव काम केल्याचे पुढे आले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्ह्यातील किनारी भागात १८० घरट्यांचे संवर्धन केले होते. त्यामध्ये १८ हजार ५०७ कासवांची अंडी (Turtle Eggs) होती. घरट्याचे संरक्षण केल्यानंतर ६८३ कासवांची पिल्ले मार्ग काढत काढत समुद्राच्या पाण्यात झेपावली.

कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासव (Olive Ridley Turtle) येतात. मात्र, यापूर्वी त्याचे संरक्षण होत नव्हते. त्यामुळे अनेकवेळा अंडी घातलेली ही घरटी उद्ध्वस्त होतात. प्राणी ही अंडी खातात किंवा जर अंड्यातून पिल्ले बाहेर पडली तर ती पाण्यात पोहोचेपर्यंत किनाऱ्यावरच पक्षी खातात किंवा ती मरतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून कांदळवन कक्ष, वनविभाग आणि कासवमित्र यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात कासवांच्या घरट्यांचे संरक्षण आणि संवर्धन होत आहे.

Turtle Conservation Campaign
मुंबईतील रुग्णालयातून मृतदेहांची झाली अदलाबदल अन् मृतदेहाला शेवटचं पाणी पाजण्यासाठी चेहऱ्यावरील कापड हटवलं अन्..

ज्या किनाऱ्यावर घरटी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी कांदळवन कक्षाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या हॅचरीसाठीही निधीही दिला जातो. जिल्ह्यातील मालगुंड, गावखडी (ता. रत्नागिरी), वाडावेत्ये, माडबन (ता. राजापूर) या किनाऱ्यांवर या महिन्यात चार ठिकाणी १८० घरटी मिळाली. कांदळवन कक्ष, वनविभाग आणि कासवमित्रांमार्फत त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले. यामध्ये १८ हजार ५०७ कासवांची अंडी होती. ४० ते ४५ दिवसांच्या संवर्धनानंतर ६८३ अंड्यांतून कासवाची पिल्ले बाहेर आली. ही पिल्ले मार्ग काढत समुद्राच्या पाण्यात झेपावली. यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कासवांचे संवर्धन होताना दिसत आहे.

Turtle Conservation Campaign
'शाहू छत्रपती महाराज सर्वांसाठीच आदर्श, पण 'महायुती'च्या उमेदवारासाठी आम्ही हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू'

अशी सोडली पिल्ले...

हॅचरी घरटी अंडी सोडलेली पिल्लं

  • मालगुंड ३९ ४००४ ७०

  • गावखडी ९४ ९७११ ५८८

  • वाडावेत्ये २० १९३८ २५

  • माडबन २७ २८५४ ०

  • एकूण १८० १८५०७ ६८३

Turtle Conservation Campaign
Pearl Farming : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पिकणार खरेखुरे 'मोती'; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किनाऱ्यावर कासवांचे संरक्षण आणि संवर्धन केले जात आहे. साधारण ४० ते ४५ दिवसांच्या कालावधीत अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात. आतापर्यंत ६८३ पिल्‍लांना समुद्रात सोडण्यात आले. विभागीय वनाधिकारी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

- प्रकाश सुतार, रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com