‘झाडांचे कविता वाचन’ला प्रतिसाद

‘झाडांचे कविता वाचन’ला प्रतिसाद
Published on

68613
कणकवली : येथील कणकवली कॉलेजमध्ये ‘झाडांच्या कविता वाचन’ उपक्रमाचे उद्‍घाटन करताना शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे. शेजारी वामन पंडित, प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. दिपा तेंडोलकर.


‘झाडांचे कविता वाचन’ला प्रतिसाद

कणकवली महाविद्यालयातील उपक्रम उत्साहात

कणकवली, ता.३ : येथील कणकवली कॉलेजमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, कलावंत वामन उर्फ उदय पंडीत यांच्या रानफूल छायाचित्रांचे प्रदर्शन आणि झाडांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमावेळी कणकवली कॉलेजच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, अशोक करंबेळकर, वामन पंडीत उपस्थित होते. कणकवली कॉलेजमधील सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संयुक्तपणे हा कार्यक्रम झाला.
डॉ.राजश्री साळुंखे म्‍हणाल्या, ‘‘युवा पिढीने ज्ञान आणि विज्ञानाची कास धरत असतानाच पर्यावरणाची जोपासनाही केली पाहिजे. अशोक करंबेळकर यांनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून असे उपक्रम सातत्याने चालू राहिले पाहिजेत,’’ असे आवाहन केले. वामन पंडित यांनी झाडांवरच्या कवितांचे अभिवाचन या प्रसंगी केले. तसेच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, मंगेश पाडगांवकर, विं.दा. करंदीकर, ग.दि.माडगुळकर, गुलझार, बा.भ.बोरकर तसेच जिल्ह्यातील वीर धवल परब आणि अजय कांडर अशा नामवंत कवींच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचा शेवट वा. ना. टिळक यांच्या ‘रानफूल’ या कवितेच्या अभिवाचनाने झाला. प्रा.डॉ.बी.जी. गावडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com