

68809
मळगाव ः येथील हायस्कूलमध्ये शिवप्रतिष्ठान आयोजित चित्रकला निबंध स्पर्धेतील विजेत्या मुलांसह अभिषेक रेगे, संपदा राणे, सुनील राऊळ, मुख्याध्यापक फाले आदी.
चित्रकला, निबंध स्पर्धांना
मळगाव स्कूलमध्ये प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मळगाव इंग्लिश स्कूल येथे ऐतिहासिक चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकवणाऱ्या मुलांना बक्षीस म्हणून ऐतिहासिक चरित्र व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात इतरही मुलांनी ऐतिहासिक पोवाडे, राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली. अफझलखान वधाचा प्रसंग नाट्यकृतीतून सादर करून या कार्यक्रमात रंगत आणली. मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणती शिकवण घ्यावी, याबाबत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे यांनी प्रबोधन केले. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक फाले यांचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपदी संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला. या कार्यक्रमासाठी मळगाव इंग्लिश स्कूलचे शिक्षक व कर्मचारी वृंद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे, संपदा राणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सुनील राऊळ, शिवप्रतिष्ठानचे अक्षय धुरी, मंगेश पाटील, हिंदू जनजागृती समितीचे सदस्य जीवन केसरकर आदींचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.