

rat३p१४.jpg-
६८७८६
कातळावर फुललेली हापूस आंब्याची बाग.
rat३p१५.jpg
६८७८७
यंत्राद्वारे भात कापणी करणारा शेतकरी.
rat३p१६.jpg
६८७८८
कलिंगड लागवडीचे प्रमाण वाढतेय.
rat३p१७.jpg
६८७८९
व्यावसायिक तत्त्वावर भाजीपाल्याचे मळे फुलताहेत.
rat३p१८.jpg
६८७९०
रत्नागिरीत नियोजनबध्दपणे केलेली शेती.
rat३p१९.jpg
M६८७९१
पावसाचे पाणी साठवण्यासह मत्स्यशेतीसाठी शेततळी.
- rat३p२०.jph-
६८७९२
लगडलेले हापूस
-------------
इंट्रो
कोकणातील अर्थव्यवस्था आंबा, काजू आणि मासळी यावर अवलंबून आहे. तर पारंपरिक पध्दतीने पिकवलेल्या भात उत्पादन वर्षानुवर्षे घरगुती वापरासाठी उपयुक्त पडत होते. मुंबईहून येणाऱ्या पेन्शनवर आणि गावातच मोलमजुरी करून येथील कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. या परिस्थितीमध्येही पारंपरिक पध्दतीने गावागावात शेती आणि फळबागायती केली होती. त्याला व्यावसायिक स्वरुप येण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. पश्चिम महाराष्ट्रासह अन्य भागात शेतीत नवनवीन तंत्र, पध्दतीचा वापर करत शेतकरी पुढे गेले. पण विकसित पध्दती व तंत्र कोकणातील शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नव्हते. ती उशिरा पोचली. मागील २० वर्षात शेतकरीही प्रगतशील होऊ लागला आहे. मात्र त्याचा प्रपोगंडा करण्याची मानसिकता नसल्यामुळे क्षमता असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवणे शक्य झालेले नाही. परंतु कृषी विभागाकडून गेल्या तीन ते चार वर्षात पुरस्कारासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचे फलीत २०२१-२०२२ च्या कृषि पुरस्कारात दिसत असून येथील कृषि संस्कृतीवर पुरस्काराची मोहर उमटली आहे.
- राजेश कळंबटे, रत्नागिरी
----------
कृषि संस्कृतीवर पुरस्काराची मोहर
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. त्यासाठी तळागाळातून प्रस्ताव मागवण्यात येतात. यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्हा मागेच राहिला होता. पारंपरिक पद्धतीने आंबा, काजूची बागायती आणि पावसाळ्यात भातशेती केली जात होती. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे वेगवेगळे प्रयोग करत आधुनिकतेची जोड देण्याची मानसिकता असलेले शेतकरी विरळच होते. शेतीमधील झालेले बदल कोकणातील दुर्गम भागात पोचवणारी यंत्रणाच नव्हती. कृषि विभागाचा कर्मचारी तळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणेच शक्य नव्हते. याही परिस्थितीला तोंड देत आधुनिकतेची कास धरणारे काही शेतकरी होते. परंतु पुरस्कार मिळवण्यासाठी धडपड करण्याची मानसिता त्यांच्यामध्ये नव्हती. ही मानसिकता जागवण्याचे काम कृषि अधिकाऱ्यांना करावे लागले. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९८६ ते २०१८ या कालावधीत ३१ शेतकऱ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. १९८५ साली वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार चिपळूण तालुक्यातील मुंढे येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी संस्थेला दिला होता. त्यानंतर हाच पुरस्कार १९९२ला आणि त्यानंतर १९९६ ला पुरस्कार मिळाला. २०१८ साली विक्रमी भात उत्पादन घेणाऱ्या रिळ येथील मिलिंद वैद्य यांना पुरस्कार दिला होता. पुढे कोरोनामुळे दोन वर्षे पुरस्कारासाठी प्रस्ताव आलेले नव्हता. मात्र २०२१,२०२२ या कालावधीतील सहा शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाले हे उल्लेखनीय आहे.
---------
शिवगणांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दापोली तालुक्यातील कुंभवे येथील अनिल हरिश्चंद्र शिगवण हे गेली २५ वर्षे शेती करत आहेत. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर ते शेती करू लागले. वडिलांसमवेत कृषि विषयक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे कोकण कृषि विद्यापीठासह कृषि विभागाच्या संपर्कात राहून आधुनिक तंत्रज्ञानाची व विविध विषयांची माहिती मिळत गेली. शिवगण यांची जिरायत जमिन १.६७ हेक्टर आहे. नजिकच्या शेतकऱ्यांचे सुमारे २.०० हेक्टर क्षेत्र भाडे तत्वाने घेतले आहे. त्यावर भात, नागली, वरी या पारंपारिक पिकांबरोबर चिबूड, पडवळ, काकडी, वांगी, मिरची, सिमला मिरची, कोबी, भेंडी, माठ, मुळा, मेथी, कोथिंबीर व कलिंगड आदी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहेत. खरीप हंगामातील तृणधान्य पिकांनंतर कडधान्य पिके यासह आंबा व काजू या फळपिकांचे देखील उत्पादन ते घेत आहेत. चारसूत्री भात लागवड, एस. आर. टी. पद्धत यांचा अवलंब, मशागतीसाठी पॉवर टिलर, गवत व भात कापणीसाठी ग्रासकटर, कीडनाशकांची सुरक्षित हाताळणी व फवारणी करिता नॅपसॅक स्प्रेयर, पॉवर स्प्रेयर, वैभव विळे, भातमळणी यंत्र, चैन सॉ, कडबाकुटी यंत्र, ठिबक व तुषार सिंचन, प्लास्टिक अच्छादन अशा विविध तंत्रज्ञानाच्या वापरासह शेतमालाची प्रतवारी व पॅकिंग यावर भर देवून थेट विक्री करतात. काही शेतमालाची प्रक्रिया करून विक्री केली जाते. शेतीबरोबरच पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन ते करतात.एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करताना काळाच्या गरजेनुसार टप्याटप्याने सेंद्रिय शेतीचाही अवलंब ते करीत आहेत. त्यासाठी बायोगॅस संयंत्रातून मिळणारे खत ते वापरतात. इतर शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेतली. याच कामाची दखल घेत २०२१ चा युवा शेतकरी सन्मान त्यांना मिळाला.
-------
संतोष वाघेंचा शेतीसह मत्स्यपालन, खेकडापालनावर भर
कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२२ या वर्षातील संतोष शांताराम वाघे (मु.पो. निर्हाळता, ता. चिपळूण) यांना मिळाला आहे. त्यांचे निर्हाळता गावामध्ये ३.५३ हेक्टर शेती क्षेत्रात प्रामुख्याने भात, आंबा व काजू ही पिके घेतात. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी भात लागवड केली आहे. कृषि विभागाच्या मदतीने शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण वर्ग यामध्ये उपस्थित राहून शेतक-यांना मार्गदर्शन करत असतात. खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत आहेत. गांडूळ खत उत्पादन करून सेंद्रिय शेतीवर त्यांनी भर दिला आहे. कृषि विभागाच्या विविध मोबाईल अॅपचा त्यांनी योग्य पध्दतीने शेतीसाठी वापर केला आहे. कृषि विभागाकडून प्रसारित होत असलेल्या हवामान विषयक संदेश, कृषि सल्ला या नुसार हवामानाचा अंदाज घेवून बागेतील फवारण्या ते करत असल्यामुळे त्याचा फायदा शेतीवरील रोग नियंत्रणासाठी होत आहे. जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करूनच शेतीमधील पिकांना ते खत देतात. सेंद्रिय खतासाठी बांधावर गिरीपुष्पाची लागवड त्यांनी केली आहे. परसबागेतील भाजीपाला लागवडीमधून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा फंडा अन्य शेतकर्यांसाठी मार्गदर्शक आहे. परिसरातील मृद व जलसंधारण कामामध्ये त्यांचा सहभाग अग्रणी आहे. सेंद्रिय शेतीसाठी गाईचे शेण, बागेतील पालापाचोळा, गिरिपुष्प, जिवामृत, गोमुत्राचा वापर करतात. नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्यांनी शेततळे खोदले असून त्यात मत्स्यपालन आणि खेकडा पालन केले आहे.
---------
शेतीतून समृद्धी दर्शवणारे विनायक महाजन
विनायक श्रीकृष्ण महाजन (कुडावळे, ता. दापोली) यांना २०२१ चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी २.०९ हेक्टर शेतीक्षेत्रात आंबा, काजू, नारळ, सुपारी, भाजीलाही पिके घेतली आहेत. शेतीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनातून सेंद्रिय शेतीही केली आहे. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या उपयुक्त ठरला असून त्यांनी अन्य शेतकर्यांनाही त्याचे महत्व पटवून दिले आहे. दापोलीतील भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचे संघटन करून तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विक्रीचा फंडा जिल्हास्तरावर चर्चीला गेला. फळांचा रस वापरुन कार्बोनेट करुन शितपेय निर्मितीसाठी त्यांनी पेटंट घेतले. (पेटंट- गार्सिनिया इंडिका फुट ज्युस कार्बोनेशन). फणसापासून व आंब्यापासून कॅडबरीसारखे चॉकलेट उत्पादन बाजारात प्रसिध्द आहे. गोबरगॅस प्लँटच्या नविन डिझाईनला शासनाने सबसिडी दिली आहे. हे बायोगॅस प्लॅट जिल्हयात मोठ्याप्रमाणावर बसवण्यात आले आहेत. कमी खर्चात तयार होणार्या फेरोसिमेंटच्या १० हजार लिटर क्षमतेच्या टाक्या त्यांनी तयार केल्या आहेत. गावातील तरुणांना शेततलाव बांधून त्यात मस्त्यपालनास प्रवृत्त करत रोजगाक्षम बनवण्यावर त्यांनी भर दिला आहे. पचोली या सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकर्यांना उपलब्ध करुन देत दापोली तालुक्यात सुमारे ५० शेतकर्यांना ५० एकर क्षेत्रावर पचोली लागवडीला मार्गदर्शन केले. कुडावळे गावातील आदिवासी वाडीवर बिरसा मुंडा जयंतीचे निमित्त कार्यक्रम व रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करुन आदिवासी बांधवांना एकत्र आणण्यात त्यांची मोलाची भुमिका होती. शेतीतून समृध्दीकडे कसे जाता येते हे महाजन दाखवून दिले आहे. आधी केले मग सांगितले ही उक्ती महाजन यांनी तंतोतंत खरी करून दाखवली आहे.
-----
सेंद्रीय पद्धतीचा पाइक हेमंत फाटक
२०२१ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने हेमंत यज्ञेश्वर फाटक यांचा सन्मान केला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी सारख्या ग्रामीण भागात राहणार्या फाटक यांचा प्रस्ताव कृषी विभागातील अधिकार्यांनी त्यांचे कार्य पाहूनच तयार केला. कागदपत्रे तयार करण्यापासूनचे मार्गदर्शनही केले गेले. कार्य करत असलेल्या शेतकर्याला पुरस्काराची गरज नसते. तसच काहीसे फाटक यांचे आहे. साध आणि सरळ व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. खाडीकिनारी वसलेल्या चिंचखरी गावात राहणार्या हेमंत यांच्यावर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडीलोपार्जित शेती, बागायतीची जबाबदारी येऊन पडली. लहानपणापासून शेतीचे संस्कार असल्यामुळे तशी त्यांना प्रचंड आवड होती. खाडीच्या भरतीचे पाणी शेतामध्ये येऊ नये यासाठी फाटक कुटूंबियांनी स्वतःहून गावातील लोकांच्या मदतीने मातीचा बांध घातला. पण दरवर्षी पावसाळ्यात भरतीच्या पाण्याने शेतीचा काही भाग पाण्याखाली जातो. तरीही खचून न जाता फाटक यांनी शेती सोडली नाही. नवनवीन प्रयोग करत त्यामधून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गावातच त्यांची सुमारे ३२ एकर जमिन असून त्यात १५ एकरवर भातशेती, भाजीपाला, सुर्यफुल, कुळीथ याची लागवड करतात. तर उर्वरत भागात आंबा, नारळ, सुपारीची लागवड त्यांनी केली आहे. काळीमिरी, अननस, केळीच्या आंतरपिकामधून ते उत्पन्न घेत आहेत. कोळंबी पालनाचाही प्रयांग त्यांनी केला. सेंद्रिय शेतीसाठी गाईचे शेण, बागेतील पालापाचोळा, गिरिपुष्प, जिवामृत, गोमुत्राचा वापर करतात. नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून शेततळे खोदले असून त्यामध्ये कोळंबी पालन करत आहेत. आंबा उत्पादनही सेंद्रीय पध्दतीने घेत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनाने मोठी मागणी आहे.
-----
फणसकिंग मिथिलेश देसाई
फणसाला कल्पवृक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी गेले काही वर्षे प्रयत्न करणार्या मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना युवा शेतकरी पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. त्यांनी फणसकिंग अशी ओळख निर्माण केली आहे. झापडे (ता. लांजा) येथे स्वतःच्या पावणेदोन हेक्टर शेती-बागायतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून महाराष्ट्रातील सर्वात पहिली फणसाची बाग निर्माण केली. त्यामध्ये जगभरातील ८६ प्रजातींचे संगोपन केले आहे. देशभरातील शेतक-यांना फणस पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. शासन मान्य फणस नर्सरी, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतीपूरक उपक्रम अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने राबवले आहेत. गांडूळ खत उत्पादन करून सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पालाही मंजुरी मिळून असून त्याचे काम सुरू झाले आहे. परदेशात फणसाची झाडं निर्यात करणारे भारतातील पाहिले शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. परदेशातील कंपनी सोबत सामंजस्य करार करून झाडं व प्रक्रिया केलेले उत्पादन निर्यात करण्याचा त्याचा मानस असून त्यादृष्टीने पावलेही उचलली आहेत. त्यांनी फणसाची हिरवी पानेही परदेशात निर्यात केली आहेत. सेंद्रिय शेतीसाठी गाईचे शेण, बागेतील पालापाचोळा, गिरिपुष्प, जिवामृत, गोमुत्राचा वापर करतात. नाविन्य पूर्ण उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील पहिली अॅवाकॅडोची लागवड त्यांनी केली आहे.
---------
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे अजय तेंडुलकर
डोर्ले येथील शेतकरी अजय रविंद्रनाथ तेंडुलकर यांनी डोर्ले (ता. रत्नागिरी) येथील गावात २३ एकर जमिनीत आंबा, नारळ, सुपारीची बाग फुलवली आहे. त्यामधून दर्जेदार उत्पादन घेत गेली एकोणीस वर्षे शेती-बागायती प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन बनवले आहे. बागायतीमधील देखाभालीचा खर्च वळता करण्यासाठी आंतरपिकाचा प्रयोग यशस्वी अन्य शेतकर्यांसाठी आदर्शवत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्यांनी आपला शेतीव्यावसायात प्रगती साधली आहे. कोकण कृषि विद्यापीठ दापोली येथून इस्राईल पद्धतीचे आंबा लागवड तंत्रज्ञान माहिती घेऊन सघन आंबा लागवड केली आहे. तर नारळ पिकामध्ये मसाला पिक उत्पादन घेतले आहे. एकत्मिक पिक सरंक्षण पध्दतीनुसार फवारणी करतानाच फळमाशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी रक्षक सापळे, बुरशीजन्य रोगांचे प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर अशा पध्दतीचा अवलंब ते करत आले आहेत. सौर पंप योजनेचा लाभ घेत त्यांनी विजबिलांचा प्रश्न सोडवला आहे. कातळावरील त्यांनी फुलवलेली बाग कोकणातील अन्य शेतकर्यांसाठी मार्गदर्शक आहे. पिकांना सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे बारमाही नियोजन केले. आंब्याची विक्री मुंबई बाजारातच नव्हे तर ते ग्राहकांना घरपोचही देतात. चार सूत्री पद्धतीने भात शेतीही ते करत आले आहेत. गांडूळखत, सेंद्रिय खत, जीवामृत, निंबोळी अर्क, बायोडायनामिक कंपोस्ट, इत्यादी सेंद्रिय निविष्ठा ची निर्मिती व वापर केला जातो. यासाठी त्यांनी गोपालन व कुक्कुटपालनाची कास धरली आहे. सोशल मीडीयाचा वापर करून ते शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत २०२२ चा उद्यानपंडीत पुरस्कार जाहीर झाला आहे.
-------
rat४p१०.jpg-
68782
सागर सांगवे
कोट
कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व तत्सम संस्थाद्वारे शेतकऱ्यांनी घेतलेले विविध प्रशिक्षणे, तसेच राबविलेले उपक्रम याची माहिती प्रसारणासाठी फेसबुक, व्हाट्सअप, युट्युब याद्वारे केलेला प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर यांचा गुणांकन वाढीसाठी शेतकऱ्यांना फायदा झाला.
- सागर सांगवे, तंत्र सहायक, कृषि विभाग
rat४p११.jpg
68783
सुनंदा कुऱ्हाडे
कोट २
जिल्ह्यात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे. मात्र शासनाच्या पुरस्कारासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. अनेकांना त्याची माहितीही नसते. त्यामुळे कृषि विभागाचे कर्मचारी अशा शेतकऱ्यांपर्यंत पोचले आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारात प्रस्ताव सादर करावयाचे याचे मार्गदर्शन केले.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी
--------
68784
rat४p१२.jpg-
कोट ३
कृषि विभागाच्या पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. शेतामध्ये केलेले प्रयोग अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतीमधील नवीन पिढी घडवण्यासाठी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा आदर्श तयार होईल. सध्याच्या बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी तयार होतील.
- डॉ. विवेक भिडे, ज्येष्ठ बागायतदार, रत्नागिरी
-----
68785
rat४p१३.jpg-
कोट ४
पडीक जमिनीवरच नव्हे तर कातळावर शेती-बागायती करता येऊ शकते, हे काही शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी अन्य शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. ही उदाहरणे भावी पिढी घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. शेतीमध्ये बदल घडवणाऱ्यांचा सन्मान झाला तर ते अन्य शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देणारे ठरू शकेल.
- जीवन देसाई, प्रांताधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.