

68812
वेतोरे ः सातेरी वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धांतील विजेत्या मुलांसह मान्यवर.
ग्रंथांमुळे देशाचा सांस्कृतिक विकास
उदय गोसावी ः वेतोरेत स्पर्धांचे पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ ः ग्रंथ अथवा पुस्तके हे माणसे घडविण्याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होत असतात. देशाचा विकास हा भौतिकदृष्ट्या कितीही असला, तरी तो सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने किती विकसित आहे, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे ग्रंथ चळवळीचा, वाचन संस्कृतीचा विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वेतोरे केंद्रशाळेचे मुख्याध्यापक उदय गोसावी यांनी केले.
वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने घेतलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धांचे पारितोषिक वितरण व ग्रंथप्रदर्शन उद्घाटन मुख्याध्यापक गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेतोरे येथील श्री साई योगेश्वरी मंगल कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर वेतोरे-वरचीवाडी सरपंच प्राची नाईक, ग्रामपंचायत सदस्य साक्षी राऊळ, वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे, उपाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर, संचालक दीपक नाईक, समीर राऊळ, विजय सावंत, मीनाक्षी शिरोडकर, चारू वेतोरकर, पूजा धुरी आदी उपस्थित होते.
यानिमित्त वाचनालयाच्या वतीने चित्रकला व रंगभरण आदी स्पर्धा घेण्यात आली. रंगभरण स्पर्धा पहिली ते दुसरी व तिसरी चौथी या गटात घेण्यात आली. पहिली ते दुसरी गटात प्रथम स्वरा नाईक, द्वितीय वरदा वेतोरकर, तृतीय पांडुरंग गोगटे. तिसरी ते चौथी गटात पृथ्वीराज सावंत प्रथम, तनिष्का सावंत द्वितीय, हर्ष कांबळी तृतीय. चित्रकला स्पर्धा पाचवी ते सातवी या गटात घेण्यात आली. यात चिराग सावंत प्रथम, सुजल जाधव द्वितीय व समर्थ मेस्त्री तृतीय यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचा वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. वैभव गोगटे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.