बहादूरशेख नाक्यावर अनधिकृत जाहिरातीचे फलक

बहादूरशेख नाक्यावर अनधिकृत जाहिरातीचे फलक
Published on

rat3p38.jpg-
68864
चिपळूणः शहरातील बहादूरशेख नाक्यावर अशा प्रकारे अनधिकृतपणे जाहिरातींचे फलक लागले आहेत.
----------------------
चिपळूणात बहादूरशेख नाक्यावर
जाहीरातींचे अनधिकृत फलक
चिपळूण, ता. ३ः शहरातील बहादूरशेख नाका परिसरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले आहे. जागा मिळेल तिथे जाहिरातीचे फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर उड्डाणपुलासाठी उभारलेल्या पिलरचा जाहिरातीसाठी वापर केला जात आहे.
चिपळूण शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी फलक लावले जात आहेत. पालिकेकडे कोणतेही शुल्क न भरता अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. शहर, तालुका आणि कोकणात येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक बहादूरशेख नाक्यावर लावले आहेत. काही महिन्यापूर्वी बहादूरशेख नाक्यावर उड्डाणपूल कोसळला, तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत फलक लावले होते. तेव्हा पालिकेने त्या फलकांवर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा असे फलक लावले गेल्यास गुन्हा नोंदवण्याचा इशारा दिला होता.
उड्डाण पुलाच्या पिलरवर बसवलेले गर्डर काढण्यात आले आहे. त्यामुळे पिलर मोकळे झाले आहेत. त्या पिलरवर जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहेत. पागनाका येथे चौकात असे जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहेत. त्यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

कोट
परवानगी न घेता शहरात ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत. ते फलक संबंधितांनी काढून घ्यावी नाहीत तर आम्ही कारवाई करून हे फलक जप्त करू.
- मंगेश पेढांबेकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका

पागनाका येथील चौकात फलक लावू नये असे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा पालिकेकडे सूचना केल्या आहेत. कारण येथील चौकात फलक लागल्यानंतर समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. प्रसिद्धीच्या नादात कोणाचा तरी जीव जाण्याची शक्यता अधिक आहे.
- मनोज भाटवडेकर, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com