सात महिन्यानंतरही नुकसान भरपाईची प्रतीक्षा

सात महिन्यानंतरही नुकसान भरपाईची प्रतीक्षा
Published on

पान ३

सात महिन्यानंतरही
नुकसान भरपाईची प्रतीक्षा
अतिवृष्टी आणि अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे नुकसान
चिपळूण, ता. ३ : जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, तर ऑक्टोबरमध्ये झालेल्‍या अवेळी पावसामुळे चिपळूण तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली आहे, मात्र ती ७ महिन्यानंतरही न मिळाल्याने तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यात ग्रामीण भागामध्ये १२ हजार ५७० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. तालुक्यात जुलैमध्ये पुराचे पाणी शिरल्‍याने ५६ गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान सोसत शेतकऱ्यांनी लागवड करून पीक घेतले, मात्र ऐन कापणीच्या वेळी ऑक्टोबरमध्ये अवेळी पावसाने पुन्हा तडाका दिल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक हिरावून नेले. जवळपास सर्वच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची झळ बसली. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देत भरपाईची घोषणा केली. नुकसानीसाठी प्रति हेक्टर आठ हजार ५०० रुपये तर ऑक्टोबरमधील नुकसानीसाठी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर अशी भरपाई सरकारने जाहीर केली, परंतु ७ महिन्यांचा कालावधी लोटला तरी सरकारकडून भरपाईची रक्कम मिळालेली नाही.


कोट
कोकणातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांना मिळणारी नुकसानीची रक्कमही कमी असते. ती वेळेवर मिळाली तरच शेतकऱ्याला पुढील शेतीची कामे करण्यास मदत मिळू शकेल. मात्र गेल्‍या काही वर्षांत नुकसान भरपाई घोषित होते, मात्र ती मिळत नसल्‍याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
- अंबादास कदम, शेतकरी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com