

68896
तानाजी पांगे
तानाजी पांगे यांना जीवन गौरव पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ३ ः ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) या संस्थेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार २०२४ आचरा-गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर झाला.
सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आचरा येथे ३० एप्रिलला होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वार्षिक अधिवेशनात वितरण करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष अशोक कांबळी यांनी दिली.
पांगे यांनी गेले अर्धशतक रंगकर्मी म्हणून रंगदेवतेची सेवा केली आहे. मुंबई येथे कामगार रंगभूमीपासून आचरा पंचक्रोशीसारख्या ग्रामीण रंगभूमीची नाळ त्यांनी आपल्या सेवेने जोडली आहे. गेली ५० वर्षे नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, सादरीकरण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. ‘दैव हवे सोबतीला’, ‘उष्ट्या पत्रावळी’ आणि ‘वाट वेगळी नियतीची’, अशी अनेक नाटके त्यांनी लिहून दिग्दर्शित केली आहेत. तरुणांसाठी नाट्य प्रशिक्षण घेणे, नाट्यमंडळाचे नाटक दिग्दर्शित करणे आदी सेवा पांगे यांनी छंद म्हणून जोपासली. त्यांच्या या कार्याचे कौतुक म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा व विविध व्यक्ती, संघटनांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.