Olive Ridley Turtle Konkan
Olive Ridley Turtle Konkanesakal

Olive Ridley Turtle : माडबन, वेत्ये समुद्र किनारी तब्बल 4 हजार 792 अंड्यांचे संरक्षण; कासवांच्या घरट्यांमध्ये मोठी वाढ

माडबन, वेत्ये येथील सागरी किनाऱ्‍यावर कासवाची अंडी (Turtle Eggs) संरक्षित करण्यात आली आहेत.
Summary

संरक्षित केलेल्या वेत्ये येथील घरट्यांमधून कासवाची २५ इवलीशी पिल्ले बाहेर पडली असून, या पिल्लांचा समुद्रातील जीवनप्रवास सुरू झाला आहे.

राजापूर : तालुक्यातील माडबन, वेत्ये येथील सागरी किनाऱ्‍यावर कासवाची अंडी (Turtle Eggs) संरक्षित करण्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी घरटी आणि अंड्यांमध्ये वाढ झाली असून, दोन्ही ठिकाणी मिळून ३३ घरटी जास्त आणि तीन हजार अंडी जादा आढळून आली आहेत.

संरक्षित केलेल्या वेत्ये येथील घरट्यांमधून कासवाची २५ इवलीशी पिल्ले बाहेर पडली असून, या पिल्लांचा समुद्रातील जीवनप्रवास सुरू झाला आहे. माडबन येथील घरट्यांमधून अद्याप एकही पिल्लू बाहेर पडलेले नाही. वेत्ये आणि माडबनच्या समुद्र (Madban Beach Ratnagiri) किनाऱ्यावर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली कासवाच्या अंड्याचे योग्य पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण करण्यात आल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.

Olive Ridley Turtle Konkan
रात्रीचे ते वेदनादायी चार-पाच तास..; भटक्या कुत्र्याने पायाचा लचका तोडल्याने निष्पाप श्रृष्टीचा मृत्यू, मृतदेह थेट स्मशानभूमीत

माडबन आणि वेत्ये किनाऱ्‍यावर ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtle Konkan) प्रजातीच्या समुद्र कासवाच्या मादीकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंडी घातली आहेत. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत १४ घरट्यांमध्ये १ हजार ७१३ अंडी सापडली होती तर, यावर्षी याच किनारपट्टीवर ४७ घरट्यांमध्ये तब्बल ४ हजार ७९२ अंडी आढळली आहेत.

Olive Ridley Turtle Konkan
कात्रेश्वराच्या पुनर्निर्माणामुळे तब्बल 900 वर्षे जुना इतिहास उजेडात; चालुक्य-यादव काळातील सापडली मातीची भांडी

जंगली श्‍वापदांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे यांच्यासह वेत्ये येथील कासवमित्र गोकूळ जाधव, माडबन येथील शामसुंदर गवाणकर आदी मेहनत घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com