बियाणी बालमंदिरामध्ये पालक प्रबोधन

बियाणी बालमंदिरामध्ये पालक प्रबोधन

rat10p3.jpg-
70223
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात पालक प्रबोधन कार्यक्रमात विनायक हातखंबकर यांचा सत्कार करताना दादा कदम. सोबत धनश्री मुसळे व श्री. पवार.
--------

बियाणी बालमंदिरामध्ये पालक प्रबोधन
रत्नागिरी, ता. १० : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिरामध्ये पालक प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा मंडळाचे सदस्य .विनायक हातखबंकर यांनी बालमानसशास्त्र आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.
यामध्ये त्यांनी बालविकासामध्ये आहार, खेळ, आरोग्य ही त्रिसूत्री अत्यंत महत्वाची असल्याचे व्यक्त केले. मुलांना उत्तम आहार द्यावा, फास्ट फूडपासून दूर ठेवावे. ३ ते ५ वयोगटातील मुलाचे वजन १५ ते १७ किलो असावे. ज्ञानेंद्रियांमध्ये ८० टक्के काम डोळ्याचे असते. त्यामुळे मुलांना विविध गोष्टी दाखवाव्यात. श्रवणशक्ती वाढवावी. छोटे- छोटे व्यवहारातील अनुभव द्यावेत. अशाप्रकारे आनंददायी शिक्षण मुलांना द्यावे, असे त्यांनी सांगितले. बियाणी बालमंदिरतर्फे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी श्री. हातखंबकर यांचा सत्कार केला. नियोजन मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन आसावरी पावसकर यांनी केले. आभार अपर्णा केळकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com