सोनवडे मुख्य रस्त्याचे 
राणेंच्या हस्ते भूमिपूजन

सोनवडे मुख्य रस्त्याचे राणेंच्या हस्ते भूमिपूजन

७०२१७

सोनवडे मुख्य रस्त्याचे
राणेंच्या हस्ते भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील एकूण ६५७ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृह सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून झाला. या सोहळ्यासाठी भाजप नेते नीलेश राणे हे सोनवडे येथून व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित होते. सोनवडे येथे सोनवडे मुख्य रस्त्यासाठी एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यात दोन ब्रिज, ७ नवीन मोऱ्या, ८० मीटर लांबीची संरक्षक भिंत यांसहित एकूण ४ किलोमीटर लांबीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कनिष्ट अभियंता श्री. कोचरेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा अध्यक्ष निखिल कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, पंचायत समिती सदस्य बाळू मडव, आनंद शिरवलकर, नारायण गावडे, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, सोनवडे सरपंच प्रतीक्षा घाडी, घोटगे सरपंच चैताली घाडीगावकर, जांभवडे सरपंच अमित मडव, भरणी सरपंच अश्विनी मेस्त्री, योगेश परब, चेतन ढवळ, जनार्दन गुरव, शरद गुरव, संतोष घाडी, सचिन तेली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com