योग शिक्षिका शर्मिला साने, ऋताली सनगरेचा सत्कार

योग शिक्षिका शर्मिला साने, ऋताली सनगरेचा सत्कार

rat10p5.jpg
70225
रत्नागिरी : ऋताली सनगरे हिचा सत्कार करताना अध्यक्ष मोहिनी पटवर्धन, सोबत स्तिमिता तलाठी, मेघना शहा आणि आरती पाध्ये.
-------

योग शिक्षिका शर्मिला साने,
ऋताली सनगरेचा सत्कार
रत्नागिरी, ता. १० : महिला मंडळ संस्थेतर्फे महिला दिनी महिलांचा सन्मान करण्यात आला. गेले २० वर्षे सातत्याने योगासनांचे क्लास घेणाऱ्या शर्मिला साने आणि आपल्या शारीरिक अडचणीवर मात करून कोणताही क्लास न लावता यश मिळवण्याऱ्या ऋताली सनगरे हिचा सत्कार केला.
शाल, श्रीफळ, रोख रक्कम देऊन अध्यक्ष मोहिनी पटवर्धन आणि सचिव स्तिमिता तलाठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी अलका बेंदरकरने स्वागतगीत सादर केले. साने यांची प्रकट मुलाखतीमध्ये खुप कष्टातून स्वतःचे जीवन घडवल्याचे सांगितले. दररोज योगासनाचे ६ वर्ग त्या घेतात. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे त्या योगासने शिकवतात. ऋताली सनगरे हिने अपंगत्वावर मात करून कोणताही क्लास न लावता यश मिळवले. या यशात तिचे आई, वडील, आजी, आजोबा, व सर्व शिक्षकांचा वाटा असल्याचे तिने सांगितले. पुढे ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार असल्याचे सांगितले.
सुप्रिया बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. साने बाईंच्या शिष्यांनी रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारी योगासने करून दाखवली. आशा कयाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरती पाध्ये, मेघना शहा, राखी लांजेकर, गीता वैद्य, श्रीमती काटकर, शीतल पवार, अश्विनी पवार, सुरेखा खेर यांनीही प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com