महिलांनी घेतला पारंपरिक खेळांचा आनंद

महिलांनी घेतला पारंपरिक खेळांचा आनंद

70284
आंबडोस ः महिला दिनाचे औचित्य साधून येथील महिला क्रिकेट मैदानात उतरल्या. सोबत सरपंच सुबोधिनी परब व अन्य.


महिलांनी घेतला पारंपरिक खेळांचा आनंद

आंबडोसमध्ये महिला दिन ः भजन, कीर्तनाचेही सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः भारतात सर्वाधिक पसंती असलेल्या क्रिकेट खेळाबरोबरच लोप पावत चाललेल्या लगोरी, खो-खो या पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद आंबडोस (ता. मालवण) गावच्या महिलांनी लुटला. शिवाय कोणताही सण नसताना भजन, कीर्तन याचे सादरीकरण करीत फुगड्या सुद्धा घातल्या. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे.
आंबडोस गावच्या सरपंच सुबोधिनी परब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यावेळी उपसरपंच रामदास नाईक, माजी सरपंच दिलीप परब, विष्णू परब, राधा वरवडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मराळ, सतीश दळवी, श्रद्धा नाईक, सुलभा परब, अदिती परब, सीआरपी शीतल कदम आदी महिला उपस्थित होत्या.
ग्रामीण महिलांत सुद्धा आता क्रिकेटचे वेड पसरू लागले आहे. त्याचे उत्तम उदाहरण आंबडोस येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत दिसून आले. क्रिकेटचे वेड आता ग्रामीण महिलांत उत्तमरित्या रुजू लागल्याचे यावेळी स्पष्ट झाले. याचबरोबर मोबाईलच्या जन्मामुळे दुर्लक्षित झालेले लगोरी आणि खो-खो हे खेळ खेळून गावातील महिलांनी आपली शारीरिक चपळता दाखवून देतानाच आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भजन, कीर्तन आणि फुगडी यातही आपले कसब महिलांनी दाखविले. अन्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून रॅली काढण्यात आली. यामुळे गावात सर्वत्र महिलामय आणि भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
---
महिलांच्या सबलीकरणासाठी उपक्रम
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी हिरहिरीने यात भाग घेतला होता. गावातील महिलांचे सबलीकरण व्हावे, त्यांना दररोजच्या घरगुती कामातून एक दिवस मुक्तता मिळावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, आपल्या गावच्या महिला सर्वच गोष्टींत पुढे याव्यात, यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सरपंच परब यांनी सांगितले. यावेळी महिलांच्या विजेत्या संघांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com