कासार्डेत २८ ला 
विविध स्पर्धा

कासार्डेत २८ ला विविध स्पर्धा

कासार्डेत २८ ला
विविध स्पर्धा
कणकवली ः शिवजयंतीनिमित्त (तिथीनुसार) राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ, कासार्डेच्या वतीने २८ मार्चला खुला गट समूहनृत्य स्पर्धा तसेच कासार्डे गाव मर्यादित व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुला गट समूहनृत्य स्पर्धा शाळा, महाविद्यालय, ग्रुप यांच्यासाठी आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १० हजार, ५ हजार व ३ हजार रुपये, प्रत्येकी सन्मानचिन्ह अशी बक्षिसे आहेत. सहभागी प्रत्येक संघास मानधन व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. रस्सीखेच स्पर्धेतील कासार्डे गाववाडी मर्यादित विजेत्यांसाठी ३ हजार व २ हजार रुपये, प्रत्येकी सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे आहेत. रस्सीखेच संघात आठ खेळाडू सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी सहदेव ऊर्फ अण्णा खाडये यांच्याशी संपर्क साधावा.
--

-------------------
महावितरणकडून
धडक कारवाई
मालवण ः तालुक्यातील तळगाव येथे वीज महावितरणच्या लोखंडी खांब चोरीप्रकरणी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार वीज अधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तळगाव ग्रामस्थांनी महावितरणचे येथील मुख्य अभियंता यांना दिलेल्या तक्रारीत महावितरणच्या खांब चोरीबाबत माहिती देत कारवाईची मागणी केली आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
-------------------
अल्पसंख्याक मोर्चा
सरचिटणीसपदी पटेल
कणकवली ः भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी माजी उपसभापती बुलंद पटेल यांची निवड करण्यात आली. आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष फर्नांडिस, रज्जाक बटवाले, सर्वेश दळवी आदी उपस्थित होते.
--------------------
रेखाकला परीक्षेत
रेडी शाळेचे यश
वेंगुर्ले ः रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाने एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत यश मिळविले. २०२३-२४ या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी परीक्षेला एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते सर्व उत्तीर्ण होऊन या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. इंटरमिजिएट परीक्षेला ५६ विद्यार्थी बसले होते. त्याचा निकाल ९६ टक्के लागला. संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत, संस्था चिटणीस विनय राऊत, मुख्य सल्लागार एम. पी. मेस्त्री, मुख्याध्यापिका गीता विल्सन व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--------------------
गोगटे प्रतिष्ठानचे
गणित परीक्षेत यश
शिरोडा ः आजगाव (ता. सावंतवाडी) गावातील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वेदांत देशमुख वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आला असून, प्रचिती शेट्ये ही तालुक्यात दुसरी आली. हे दोन्ही विद्यार्थी गुरुवर्य अ. वि. बावडेकर प्राथमिक विद्यालयात पाचवीमध्ये शिकत आहेत. त्यांना प्रशाळेसह प्रतिष्ठानचे शिक्षक विनय सौदागर यांचे मार्गदर्शन लाभले. या मुलांचे कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com