ग्रंथालयांचा कारभार पारदर्शक हवा

ग्रंथालयांचा कारभार पारदर्शक हवा

70322
ओरोस ः ग्रंथालय कार्यकर्ता, कर्मचारी मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना सहाय्यक धर्मादाय आयुक्त मधुमिता निकम. शेजारी सचिन हजारे, मंगेश मस्के, प्रकाश जैतापकर, धाकू तानावडे, अॅड. संतोष सावंत, राजन पांचाळ, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, संजय वेतुरेकर, महेश बोवलेकर, संजय परब, संजय शिंदे, जयेंद्र तळेकर महेश बोवलेकर आदी.

ग्रंथालयांचा कारभार पारदर्शक हवा

मधुमिता निकम ः ओरोस येथे कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः ग्रंथालयाचे रेकॉर्ड चांगले ठेवा. इतिवृत्त, वार्षिक सर्वसाधारण सभा यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. संस्थेची कागदपत्रे योग्य पद्धतीत असतील, तर चेंज रिपोर्ट, घटना बदल अथवा इतर कामकाज कधीही रोखले जात नाही. संस्थेचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि कायद्याच्या चाकोरीत असल्यास कुठलेही काम सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे कधीच थांबणार नाही, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सिंधुदुर्गच्या मधुमिता निकम यांनी केले.
ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, ओरोस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांना एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्‌घाटन श्रीमती निकम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, अनंत देसाई वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, उपाध्यक्ष धाकू तानावडे, सहसचिव महेश बोवलेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष संचालक संजय शिंदे, संजय वेतुरेकर, जयेंद्र तळेकर, सतीश गावडे, दीक्षा परब, ऋतुजा केळकर, गुरुनाथ मढव, प्रवीण भोगटे, देसाई वाचनालयाचे सचिव रोहिदास राणे, संजय परब, पावलो फर्नांडिस, उदय दळवी, उदय जांभवडेकर, पी. एन. मठकर, बबन सावंत आदी उपस्थित होते.
श्रीमती निकम पुढे म्हणाल्या, ‘‘संस्था व त्यांची घटना बदल, सभासद कमी करणे आदींबाबत अनेक प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे येत असतात; परंतु हे प्रस्ताव परिपूर्ण नसतात. कायद्याच्या चाकोरीत राहून ते प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यास सर्व प्रस्ताव मंजूर केले जातील. इतिवृत्त कसे लिहायला हवे, याचा अभ्यास करा. सभासद घोषवारा, घटना बदल, संस्था शपथ पत्र याबाबत कार्यकारिणी सभा, विशेष सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा या तीन सभांमध्ये ते मंजूर करणे आवश्यक आहे. संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करा.’’
..................
चौकट
ग्रंथालयाचे रेकॉर्ड काळजीपूर्वक लिहा
प्रमुख पाहणे सचिन हजारे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सध्यतपासणीमध्ये बदल केला असून, त्यामुळे सर्व ग्रंथालयांनी आपल्या कार्यालयात शासनमान्य असा बोर्ड लावायला हवा. ग्रंथालयातील रेकॉर्ड काळजीपूर्वक लिहा. वर्गणीदार, सभासद याबाबत योग्य माहिती नोंद करून ठेवा. शासनमान्य ग्रंथालयाचे काम करत असल्यास सर्व रेकॉर्ड दर्जेदार आणि व्यवस्थित असावे. कमीत कमी सहा वर्तमानपत्रे वर्गवारीनुसार ठेवायला हवीत. ग्रंथालयाचे काम दर्जेदार आणि उत्तम करा.’’ यावेळी राजू आडेलकर यांनी विचार मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com