आठ तहसीलदारांना नव्या वाहनांचे वितरण

आठ तहसीलदारांना नव्या वाहनांचे वितरण

rat10p28.jpg
70315
रत्नागिरी - आठ तहसीलदारांना नव्या वाहनांचे वितरण पालकंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
--------

आठ तहसीलदारांना मिळाले नवीन वाहन
रत्नागिरी, ता. १० : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ८ तहसीलदारांना चावी प्रदान करून ८ नव्या वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून ८१ लाख ९२ हजाराच्या निधीतून या गाड्या घेण्यात आल्या.
पालकमंत्री सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तहसीलदारांसाठी ८ नव्या गाड्या घेण्यात आल्या. जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या लेखाशीर्ष खाली ८१ लाख ९२ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला. या नव्या वाहनांचा जिल्ह्यासाठी प्रशासकीय कामकाजासाठी निश्चितच उपयोग होणार आहे. या वाहन वितरणप्रसंगी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com