सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक 
जगदीश दुधवडकर यांचे निधन

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांचे निधन

70338
जगदीश दुधवडकर

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
जगदीश दुधवडकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १० : येथील पोलिस ठाण्याच्या आवारात हृदयविकाराचा झटका आल्याने आंबोली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर (रा. परुळे, ता. वेंगुर्ले) यांचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
दुधवडकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दुधवडकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते. त्यानंतर त्यांना आंबोली येथील पोलिस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली होती. आज सकाळी ते पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांना उपचारासाठी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; परंतु सहकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दुधवडकर हे परुळे (ता. वेंगुर्ले) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुलगी वकिलीचे शिक्षण घेत आहे. सावंतवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ज्योती दुधवडकर यांचे ते पती होत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com