ठाकरेविरोधात भास्कर जाधवांचा नाराजीचा सूर

ठाकरेविरोधात भास्कर जाधवांचा नाराजीचा सूर

पान १
७०३५२
माझ्याविरोधात स्वकीयांचे षङ्‍यंत्र
भास्कर जाधव ः उद्धव ठाकरेंविरोधात नाराजीचा सूर; घरभेदी ओळखा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : जनतेने दाखविलेल्या अतुट विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करणारे पत्र लिहिल्यानंतर आज येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर आळवला. आपल्याच पक्षातील लोक माझ्या विरोधात षङ्‌यंत्र रचत असल्याचा आरोप करत मी पक्ष सोडणार नाही; पण घरभेदी ओळखा, असा इशारा त्यांनी दिला.
आमदार जाधव म्हणाले, ‘‘शिवसेना फुटली तेव्हा गटनेता म्हणून त्या पदावर माझा दावा होता, पण त्यावेळी मला गटनेता केले नाही. तेव्हा मी फार काही बोललो नाही. शिवसेना फुटीनंतर ज्यावेळी मुंबईत बैठक बोलावली, त्यावेळी ‘वर्षा’वर मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, जर आपण भाजपबरोबर जात असाल तर मी येणार नाही. राष्ट्रवादीत असताना मी मंत्री होतो, मात्र सीनिअर असूनही मला इकडे आल्यावर मंत्रिपद दिले नाही. मी त्यावेळी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली नाही. ज्यांना उद्धवसाहेबांनी मंत्रिपदे दिली, त्यांनी भाजपविरोधात कधी शब्द तरी काढला का. २०२४ पर्यंत मी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. माझे पत्र व्हायरल करणारे लोक हे घरचे भेदी आहेत. भाजपच्या एका नेत्यांबरोबर राडा झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यावेळी आपल्याच पक्षातील लोकांनी माझ्या समर्थक कार्यकर्त्यांची यादी पोलिसांना दिली. शेखर निकम महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मी चिपळूणच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आशीर्वाद घेतले. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटूनही चिपळूणची जागा शिवसेनेने लढवावी, असा आग्रह धरला. त्यावेळी चिपळूणमधल्या काही निष्ठावंतांनी नवीन उमेदवार तयार केला. मी गेली दोन महिने शांत असल्यामुळे आता पुन्हा उमेदवार शोधण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.’’


उशाखाली साप घेऊन
झोपता येत नाही
आमदार भास्कर जाधव म्हणाले, ‘‘उशाखाली साप घेऊन झोपता येत नाही. हे सत्य तुमच्यासमोर मला आणायचे होते म्हणून तुम्हाला एकत्र बोलावले आहे. आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशीच यापुढेही खंबीर साथ द्या. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com