बांद्यात काजूगराचे दुकान फोडून रोकड पळविली

बांद्यात काजूगराचे दुकान 
फोडून रोकड पळविली
Published on

70384
बांदा ः येथील काजूगराचे दुकान चोरट्याने फोडून रोकड पळविली. (छायाचित्र-नीलेश मोरजकर)

बांद्यात काजूगराचे दुकान
फोडून रोकड पळविली

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः कट्टा कॉर्नर येथील बसस्थानक मार्गावरील मांगिरीश कॅश्यू अँड ड्रायफ्रूटस्‌ हे दुकान शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडले. यात सुमारे ३ हजारांची रोकड, सुमारे १० हजार रुपयांचे काजूगर चोरांनी पळविले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने शटर तोडून आत प्रवेश केला. भरवस्तीतील व गजबजलेल्या मार्गावरील या धाडसी चोरीमुळे शहरात मात्र खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. उद्या (ता.११) सकाळी याबाबत फिर्याद दाखल करणार असल्याचे चिन्मय नाडकर्णी यांनी सांगितले. येथील पोलिसांनी सकाळी नुकसानीची पाहणी केली. अधिकृत फिर्याद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

siya goyal
Pune
Dr. Valsangkar suicide case
jewellery theft
Marathi News Esakal
www.esakal.com