

rat11p6.jpg
70440
चिपळूण - मुलींना मार्गदर्शन करताना तज्ज्ञ मार्गदर्शक.
मर्चट नेव्हीबाबत नुसीतर्फे मार्गदर्शन
मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी
नुसीतर्फे मुलींना मार्गदर्शन
चिपळूण, ता. ११ : नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व युनियन तथा नुसी अकॅडमी यांच्यावतीने महिलादिनाचे औचित्य साधून मुलींसाठी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन शिबिर ९ मार्चला साठे संकूल चिपळूण येथे पार पडले. १० वी, १२वीनंतर नेमके कोणकोणत्या क्षेत्रात करियर विद्यार्थ्याने करावे, त्यातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही. या क्षेत्रात करिअर करायला उत्तम संधी आहे; परंतु या क्षेत्राविषयी तेवढी जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये नसते. त्यामुळे मर्चंट नेव्हीविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या शिबिराचे आयोजन केले होते.
मर्चंट नेव्ही क्षेत्राबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व युनियनचे सहसचिव सलीम झगडे उपस्थित होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना करिअर नेमके कोणत्या क्षेत्रात करता आले पाहिजे त्या क्षेत्राची माहिती असणे गरजेचे आहे. त्यापैकी मर्चंट नेव्ही एक अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे व त्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती नसते. या क्षेत्राविषयी माहिती व्हावी आणि त्या क्षेत्रा विद्यार्थ्यांना करिअर करण्यात संधी निर्माण व्हावी यासाठी नॅशनल युनियनऑफ युनियन तथा नुसी मरिन अॅकॅडमी यांनी कोकणातील १० मुलींनी या क्षेत्राकडे वळावे. नुसीने घेतलेला हा पुढाकार मुलींसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. या मार्गदर्शन शिबिरातून अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या शिबिरात मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्यासाठी आव्हाने आणि संधी तसेच जीपी रेटींग व सीसीएमसी या कोर्सची विस्तृत माहिती देण्यात आली. व्यापारी नौदलातील जहाजांचे प्रकार, माल वाहून नेण्याची पद्धत आणि कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व युनियन यांना १२७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महिलादिनाचे औचित्य साधून मुलींसाठी अल्प फी मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष बॅच घेण्यात आली असल्याने नुसी मरिन अॅकॅडमी गोवा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ॲकॅडमीतून कोर्स करून बाहेर पडलेल्या मुलींना भारतातील नामांकित कंपनी अँग्लो इस्टर्न कंपनीत नोकरीची संधीदेखील मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन नुसीचे सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला नुसीचे अजिम फणसोपकर, समीर करबेलकर, फरजाना सावंत, मुबारक जुवळे व इरफान चिपळूणकर, जलील नांदगावकर, जौहर सावंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमजान कडवईकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.