Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal

'स्वराज्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशीच माणसं छत्रपती शिवरायांनी पारखून, आजमावून घेतली!'

छत्रपती शिवाजी महाराजांकडे व्यक्तिमत्त्व पारखून घेण्याची एक वेगळीच दूरदृष्टी होती.
Summary

माणसं ओळखण्याची कला हीच उद्योजकतेला खऱ्या अर्थाने आकार देऊ शकते. अनुभव हा गुरू असतो. अनुभवच माणसाला माणसांची खरी ओळख करून देत असतो.

-प्रसाद अरविंद जोग (theworldneedit@gmail.com)

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिले ते म्हणजे योग्य माणसे हेरण्याचे. स्वराज्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशीच माणसे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारखून, आजमावून घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांकडे व्यक्तिमत्त्व पारखून घेण्याची एक वेगळीच दूरदृष्टी होती. त्यांच्याकडे माणसांमधील गुण-दोष ओळखण्याचे कसब होते.

कोणतेही कार्य एकल व्यक्ती पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्याला माणसे लागतात. उद्योजकांनी (Business) सुध्दा माणसे ओळखण्याची कला शिकून घ्यायला हवी. स्वतःच उद्योजकीय स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपली सारी भिस्त आपल्याशी, आपल्या उद्योजकतेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित असणाऱ्या विभिन्न स्वभावाच्या माणसांवरच अवलंबून असते, हेच वैश्विक सत्य आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Konkan Tourism : हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गानं 'या' गावाला दिलाय!

माणसांमाणसांचे योग्य निरीक्षण करून, त्यांचे स्वभाव, त्यांच्या इच्छा-आकांक्षा जाणून त्यांच्याशी व्यवहार केल्यास फसगत होण्याचे प्रमाण खूपच कमी होते. काय बनवायचं, काय विकायचं, केव्हा उत्पादन घ्यायचं, केव्हा विक्री करायची, कुठे-कुठे बाजारपेठ उपलब्ध आहे, कुठे नवे ग्राहक मिळू शकतात, उद्योग का करायचा, उद्योग कसा वाढवायचा, कसे उद्योगात यशस्वी होता येईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्योग साकारताना स्वतःहून उद्योजक शोधतच असतात. पण, कोणासोबत उद्योग करायचा, कोणत्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यायचे, उद्योजक म्हणून कोणाचा सल्ला घ्यायचा यासाठी माणसे ओळखण्याची कलाच उद्योजकाला अवगत असणे गरजेचे असते. अनुभवी उद्योजकांकडे माणसे ओळखण्याची कला विकसित झालेली दिसून येते.

अनुभवी उद्योजक विविध व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करून आपल्या उद्योजकीय वाटचालीसाठी लागणारी अनुकूल माणसे आपल्याबरोबर घेऊन पुढे वाटचाल करण्यास भर देतात. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांमुळेच एक उद्योजक म्हणून आपले यशापयश अवलंबून असते. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांमधील गुण ओळखण्याची गुणग्राहकता उद्योजकाकडे असेल तर उद्योजकाला आपल्या अवतीभोवती चांगल्या माणसांची परिसंस्था तयार करता येते. अशी परिसंस्था उद्योजकीय वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करते. उद्योजकाला उद्योग करताना विविध माणसांची गरज लागत असते.

Chhatrapati Shivaji Maharaj
Sahyadri Tiger Project : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने पर्यटन व्यवसायात संधी; सातारा, सांगली, कोल्हापूरसह रत्नागिरीत विस्तारला प्रकल्प

व्यवसाय करत असताना आपला सहव्यावसायिक, भागीदार, गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी, वितरक, भागभांडवलदार, कच्चा माल पुरवठादार, वित्त पुरवठादार, मध्यस्थ, सल्लागार, करसल्लागार, विपणन व्यवस्थापक, विक्रेता, आयातदार, निर्यातदार, स्पर्धक या व अशा व्यावसायिक रूपरेखांच्या अनुषंगाने माणसांच्याच संपर्कात यावे लागते. त्याला तरणोपाय नाही. म्हणजेच माणसं ओळखण्याची कला हीच उद्योजकतेला खऱ्या अर्थाने आकार देऊ शकते.

अनुभव हा गुरू असतो. अनुभवच माणसाला माणसांची खरी ओळख करून देत असतो. माणसं ओळखण्यात सगळ्यात महत्त्‍वाचा ठरतो तो म्हणजे मनाचा कौल. स्पष्ट उद्दिष्ट नसलेला उद्योजक उद्योग उभारणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फार विचार न करताना कोणाही व्यक्तीच्या वरकरणी आश्वासनांना भुलू शकतो व तिथेच नकळतपणे चुकीच्या माणसांच्या भूलथापांना, आमिषांना बळी पडू शकतो.

Chhatrapati Shivaji Maharaj
ग्राहक मिळवण्याची किंमत उद्योजकांनी लक्षात घ्यायला हवी, अन्यथा नुकसान होण्याची भीती!

माणसे ओळखण्याची कला अवगत करताना किंवा तसा सराव करत असताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात त्या गोष्टींची क्रमवार यादी इथे उद्योजकांसाठी देत आहोत.

  • आपण विश्वास ठेवत असलेली माणसे विश्वास ठेवण्याच्या खरंच पात्रतेची आहेत का याची शहानिशा करणे.

  • गरज आहे म्हणून अपरिचित, अनोळखी व्यक्तीवर डोळेझाकपणे विश्वास टाकू नये.

  • व्यक्तींना आजमावून पाहताना त्यांच्यातल्या प्रामाणिकपणाला, सच्चाईला प्राधान्यता द्या.

  • संघ बांधणी करताना निष्ठेला महत्त्व द्या.

  • व्यक्ती तशा प्रवृत्ती असणारच पण माणसांचे निरीक्षण करताना त्यांच्या डोळ्यातील भाव त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जातात. हे उद्योजकांनी आवर्जुन लक्षात ठेवावे.

  • कामगार, कर्मचारी निवडत असताना त्यांचे वैयक्तिक सामर्थ्य व क्षमता यांना उपयुक्ततेच्या सिद्धांतानुसार निर्देशित करणे.

  • संघ बांधणी व संघटना बांधणी करताना योग्य माणसाला योग्य जागी नेमणे

  • ग्राहकांचा विश्वास संपादन करणारेच विक्रेते आपल्या आस्थापनेचे प्रतिनिधित्व करतील याची खातरजमा करून घेणे.

  • संवेदनशीलता, वैचारिक प्रगल्भता, मानवता यांना अनुसरणारे व्यक्तिमत्त्व आपल्या उद्योगात असावे म्हणून आग्रही असणे.

  • एकात्मिक कार्यपद्धतीचा अवलंब करून माणसांतील नेतृत्व गुण हेरणे.

  • जलद आकलन क्षमता असणारा, आत्मविश्वास असणारा, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा, नेतृत्व गुण असणारा उद्योजक मित्र भागीदारी करण्यास अनुकूल असू शकतो.

  • पुढाकार घेणारी, स्वयंप्रेरित माणसे आपल्या उद्योगाशी संबंधित परिसंस्थेत कशी येऊ शकतील त्याचा विचार करणे.

  • माणसं ओळखण्यात उद्योजक यशस्वी झाले तर चुकीच्या पद्धतीने उद्योग विस्तारला जाणार नाही व आपल्यातील माणसालाच त्याचा फायदा होईल व एक योग्य उद्योजकीय परिसंस्था निर्माण होईल.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com