नागरिकांनी हक्क व अधिकारांविषयी जागृत राहा
१८ (टुडे ३ साठी, अँकर)
- rat२०p१२.jpg-
२४M७२३६७
कळंबणी ः येथील जिल्हा परिषद शाळेतील कायदेविषयक शिबीरात तज्ज्ञ मार्गदर्शन करताना.
नागरिकांनी हक्क, अधिकारांविषयी जागृत राहावे
ॲड. दिलीप चव्हाण ; कळंबणी शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः तळागाळातील लोकांना कायदेविषयक ज्ञान प्राप्त व्हावे. त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, तरच ते सजग नागरिक बनतील. मूलभूत गरजा पूर्ण करताना त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आणि कायदेच्या बाबतीत निर्माण होणारे पेचप्रसंग या संदर्भात लोकांना माहिती मिळावी. नागरिकांना कायद्याची जाणीव करून देताना त्यांना सजग बनवण्यासाठी व आपल्या हक्क आणि कर्तव्य संदर्भात जागृतता निर्माण करण्यासाठी कायदेविषयक ज्ञान हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सिद्धयोग लॉ कॉलेज खेडचे प्राध्यापक अॅड .दिलीप चव्हाण यांनी केले.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा कळंबणी बुद्रुक नं. १ या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक अनिल आंजर्लेकर, गावचे सरपंच भगवान साळुंखे यांच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लॉ कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. या या कार्यक्रमाला कळंबणी सरपंच भगवान साळुंखे, उपसरपंच देवघरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र येसरे, पोलीस पाटील नरसिंह सुतार, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे उपस्थित होते. प्रा. ॲड चव्हाण म्हणाले, स्पर्धेच्या युगात कायद्याच्या काही बाजू समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. नेहमीचे जीवन जगताना अनेक वेळा कायद्याच्या चौकटीतून आपल्याला जावे लागते. अशावेळी आपल्याला कायद्याचे ज्ञान नसेल तर आपली फसगत होते आणि हीच फसगत होऊ नये यासाठीच सिद्धयोग लॉ कॉलेजने वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. दर शनिवारी सकाळी ११ ते ४ या वेळेमध्ये मोफत कायदेविषयक सल्ला दिला जातो. नागरिकांना कायद्याच्या बाबतीत सजग बनवण्यासाठी हा उपक्रम कॉलेजच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजने सुरू केला आहे.
या शिबिरात अशोक कांबळे या विद्यार्थ्यांने ग्रामपंचायत हा विषय घेत त्याच्यावरती कायदेविषयक गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थिनी सायली जांभळे हिने ग्राहक संरक्षण कायदा या संदर्भात माहिती दिली. ऋतुजा निमदे हिने महिला विषयक कायदे आणि समस्यांचे निराकरण करताना सांगितले की, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५, त्यानंतर हुंडाबळी आणि विनयभंग यावर मांडणी केली. त्यानंतर स्नेहल शिरकर हिने पॉक्सो कायद्याविषयी माहिती दिली. लोकअदालतीविषयी लीना डाके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रांमध्ये आदर्श शाळा कळंबणी बुद्रुक येथील पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांबरोबर सिद्धयोग लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.