डंपर-दुचाकी अपघातात एक जखमी

डंपर-दुचाकी अपघातात एक जखमी

swt2817.jpg
73869
मालवणः देऊळवाडा येथे दुचाकी व डंपर यांच्यात अपघात झाला.

डंपर-दुचाकी अपघातात एक जखमी
मालवणमधील घटनाः दुचाकीचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ ः शहरातील देऊळवाडा येथील धोकादायक उतारावर डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला तसेच दुचाकीस्वार दीपक बापू गांगनाईक (वय-३४, रा. सोमवार पेठ मालवण) हे जखमी झाले. हा अपघात काल (ता.२७) रात्री झाला. गोव्याहून मालवणात येणाऱ्या डंपरची वर्दळ वाढली असून भरधाव वेगाने येणारे डंपर खाडी पट्ट्यातील वाळू भरून नेण्यासाठीच मालवणात येतात, अशी खुले आम चर्चाही या अपघातानंतर सुरु होती.
कुंभारमाठहुन मालवणच्या दिशेने जाणारा दुचाकीस्वार आणि मालवणच्याच दिशेने जाणारा गोव्याचा डंपर या दोन वाहनांमध्ये रात्री अपघात घडला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने दीपक गांगनाईक हे दुचाकीस्वार बचावले. यावेळी स्थानिक नागरिकांनी दीपक यांना जखमी अवस्थेतच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातानंतर डंपर चालकाला स्थानिकांनी चांगलाच प्रसाद दिला. या अपघातानंतर मालवण-कसाल हमरस्त्यावरून ये -जा करणारे डंपरही स्थानिकांनी अडवले होते. अलीकडच्या काळात गोव्याहून मालवणात येणाऱ्या डंपरची वर्दळ वाढली असून यातील काही डंपर कालावल खाडी पट्ट्यातील बेकायदेशीर उपसा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी येतात आणि भरधाव वेगाने डंपर हाकतात. या पूर्वीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले असतानाही पोलीसात जाण्याअगोदरच अशी प्रकरण सामोपचाराने मिटविली जातात, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com