मांडकुलीत मंगळवारी 
नववर्ष स्वागत रॅली

मांडकुलीत मंगळवारी नववर्ष स्वागत रॅली

७४८०१

मांडकुलीत मंगळवारी
नववर्ष स्वागत रॅली
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः तालुक्यातील मांडकुली येथे शिमगोत्सव उत्साहात पार पडला. गावातील युवावर्ग, शिवप्रेमींनी एकत्र येऊन राधानृत्याच्या (शबय) माध्यमातून संकल्प निधी गोळा केला. त्या निधीतून ते आपल्या गावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देणार आहेत. त्यांचा हा संकल्प शबयच्या माध्यमातून पूर्ण झाला असून, येत्या मंगळवारी (ता. ९) गुढीपाडव्यानिमित्त रॅलीसहित शिवमूर्ती ग्रामपंचायत मांडकुली येथे भेट देण्यात येणार आहे. या संकल्पनेस वामन गावडे, श्रीकांत कासले, बुवा दीपक खरुडे, हरेश नेमळेकर, विनायक सावंत, सुमन गावडे, ज्ञानेश्वर कासले, प्रसाद वारंग यांच्यासह युवावर्ग अजय कासले, अक्षय कासले, वेदांत गावडे, सूरज शेगले, मयूर नाईक, विक्रांत गावडे, आकाश कासले, महेश मोर्ये, मनीष मोर्ये, वासुदेव परब, तेजस शेगले, बालकलाकार गोविंद गावडे, प्रज्ञय नेमळेकर, अनिरुद्ध मोर्ये, सोहम खरुडे आदींनी प्रतिसाद दिला. मांडकुली येथे ९ ला गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत रॅलीत सर्व ग्रामस्थ व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com