विलवडेतील अपघातात
ट्रॅक्टरचालक जखमी

विलवडेतील अपघातात ट्रॅक्टरचालक जखमी

74847
विलवडे ः खांबलेश्वर मंदिर जवळ अपघातगस्त झालेला ट्रॅक्टर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

विलवडेतील अपघातात
ट्रॅक्टरचालक जखमी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ ः बांदा-दाणोली मार्गावर विलवडे खांबलेश्वर मंदिरजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगतच्या दलदलीत जाऊन ट्रॅक्टर अपघातग्रस्त झाला. चालक जखमी झाल्याने तो काही वेळ बेशुद्ध होता. हा अपघात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नाही.
मंगळवारी दुपारी चालक ओटवणे येथून बांदाच्या दिशेने दोडामार्ग येथे रस्त्याच्या कामासाठी ट्रॅक्टरला हॉट मिक्सर जोडून घेऊन जात होता. विलवडे खांबलेश्वर मंदिर येथे दुसऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर रस्त्यालगत दलदलीत अपघातग्रस्त झाला. स्थानिक ग्रामस्थ व सरपंच प्रकाश दळवी यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. ट्रॅक्टरचे किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, गेल्या आठवड्यात वाफोली डोंगरीकर हॉटेलजवळ उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडून अपघातग्रस्त झाला होता. हा रस्ता खड्डेमुक्त झाल्याने चालक सुसाट वेगात जात आहेत. वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने हा अपघात झाल्याचे विलवडे सरपंच दळवी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com