निवडणूक पानासाठी- फ्लॅश बॅक भाग - 16

निवडणूक पानासाठी- फ्लॅश बॅक भाग - 16

निवडणूक पानासाठी- फ्लॅश बॅक भाग - १६

पुन्हा एकदा शिवसेनेचा
कोकणातील प्रभाव सिध्द
- शिवप्रसाद देसाई
लोकसभेसाठी २००४ मध्ये झालेली निवडणुक भाजपला धक्का देणारी ठरली. काँग्रेसने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली; मात्र या राष्ट्रीय स्तरावरील बदलानंतरही रत्नागिरी आणि राजापूरमधील शिवसेनेचा प्रभाव कमी झाला नाही. पुन्हा एकदा सुरेश प्रभू, अनंत गिते मोठ्या फरकाने विजय मिळवत लोकसभेत गेले.
२००४ ची निवडणुक बदल घडवणारी ठरली. काँग्रेस दिर्घकाळानंतर पुन्हा सत्तेत आली. त्यांनी मित्रपक्षांच्या मदतीने ३३५ जागा मिळवत मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. अर्थात या राष्ट्रीय स्तरावरील बदलाचा कोणताच प्रभाव या निवडणुकीत कोकणातील दोन्ही मतदारसंघांवर दिसला नाही. उलट शिवसेनेने अधिक मजबूतीने विजय मिळवला. राजापूर मतदारसंघात ८३५७१४ पैकी ४८०६१३ जणांनी मतदान केले होते. यात वैध मते ४८०५३५ इतकी होती. एकुण मतदान ५७.५१ टक्के झाले. शिवसेनेच्या सुरेश प्रभूंना २६४००१, काँग्रेसच्या सुधीर सावंत यांना १८३१०२, बहुजन समाज पार्टीच्या मोहन गोविंद परब यांना १२६१६, भारिप बहुजन महासंघाच्या सुरेंद्र बोरकर यांना ११५१३ तर अपक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांना ९३०३ मते मिळाली. रत्नागिरीतही शिवसेनेने मोठ्या विजयाची नोंद केली. येथे ९१४७७० पैकी ५६१२९९ जणांनी हक्क बजावला. ५६०९७६ मते वैध ठरवून मतांची एकुण टक्केवारी ६१.३६ इतकी नोंदवली गेली. चौरंगी लढतीत शिवसेनेच्या गितेंना तब्बल ३३४६९० मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोविंदराव निकम यांनी १८५७२२ मते मिळवली. शेकापचे अ‍ॅड. पंकज कोवळी २५९५१ तर बसपचे राजेंद्र लहु आयरे हे १४६१३ मते मिळवू शकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com