-पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

-पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

२८ (टूडे ३ साठी)

पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

आर. एम. गोसावी; अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ४ : मुंबईतील नरिमन पॉइंटच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला ग्रोयान्स बंधारा दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रात बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणीही केली. या बंधाऱ्याचा फायदा आंजर्ले खाडीतून ये-जा करणाऱ्या मासेमारी बोटींना होणार आहे तसेच आंजर्लेतील पर्यटनालाही फायदा होईल. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य अभियंता आर. एम. गोसावी यांनी दिली आहे.
हा बंधारा बांधण्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, समुद्रात ७०० मीटर लांब हा बंधारा बांधण्यात येणार आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी आंजर्ले खाडीत लावल्या जातात; मात्र, खाडी व समुद्राच्या मुखाशी गाळ साठल्याने अनेकवेळा समुद्राच्या मुखाशी बोटी भरकटून बोटीला जलसमाधी मिळते; मात्र, या बंधाऱ्यामुळे खाडीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. खाडीतील गाळ काढला जाणार असल्याने बोटींना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे दुर्घटना टळणार आहे. या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना बोटी लावण्यासाठी धक्का बांधला जाणार आहे. त्यामुळे बोटी उभ्या करून ठेवणे सोयीचे होणार आहे. या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यावर काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे थेट समुद्राच्या पाण्यात जाऊन पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com