मुंढेतर्फे चिपळूण शाळा कोकणात प्रथम

मुंढेतर्फे चिपळूण शाळा कोकणात प्रथम

२९ (टूडे ३ साठी)

- ratchl४१.jpg -
P२४M७५२३३
चिपळूण ः शाळांचा सन्मान करताना पुरोगामी शिक्षक समितीचे पदाधिकारी.

मुंढेतर्फे चिपळूण शाळा कोकणात प्रथम

माझी शाळा, सुंदर शाळा; मांडकी खुर्द तालुक्यात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः शिक्षण विभागाकडून यंदा प्रथमच राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात चिपळूण तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला. विशेषतः तालुक्यातील मुंढेतर्फे चिपळूण या शाळेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषद शाळांचा आदर्श दर्जा समाजासमोर यावा आणि असे काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, याच हेतूने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या चिपळूण शाखेने प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन त्या शिक्षकांचा यथोचित सन्मान केला. यामध्ये शाल, श्रीफळ व सन्मानपत्र संघटनेच्यावतीने शाळेला देण्यात आले. संघटनेने घेतलेल्या या कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी भारावून गेले. अशी कौतुकाची थाप प्रथमच कोणीतरी दिली, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.
या शाळांनी निश्चितच अभिमानास्पद कामगिरी केली आहे. याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. चिपळूण तालुका शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष शशिकांत सकपाळ, तालुका सरचिटणीस सुरेश धुमाळ यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून जिल्हानेते प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर, पदाधिकारी रवींद्र चव्हाण उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील प्रथम क्रमांकप्राप्त जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द, द्वितीय जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बामणोली नं. १, तृतीय जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बोरगाव नं. १ या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचा शाळेमध्ये जाऊन सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com