महाविकास आघाडीच्या ११ गणात खळा बैठका

महाविकास आघाडीच्या ११ गणात खळा बैठका

११ (निवडणूक पानासाठी)

महाविकास आघाडीच्या
११ गणात खळा बैठका

आज कापसाळला मेळावा; पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. प्रचारासाठी तालुक्यातील ११ पंचायत समिती गणात खळा बैठका घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ११ पंचायत समिती गणात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी १०.३० वा. कापसाळ येथील माटे सभागृहात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपाचे नारायण राणे की, शिवसेनेचे किरण सामंत निवडणूक आखाड्यात उतरणार याबाबतची अद्याप स्पष्टता झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यास सुरवात केली आहे. चिपळूण तालुक्यातील ११ पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या खळा बैठका घेण्यात आल्या. या बैठकांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत कण्यात आली. जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, विनोद झगडे, मुराद अडरेकर आदींनी खळा बैठकांतून मोदी सरकारवर सडकून टीका केली.
विरोधी पक्षांची गळचेपी करणाऱ्या, सरकारी यंत्रणाचा गैरवापर करणाऱ्या तसेच भांडवलशाही भाजप सरकारला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. सत्तेसाठी पक्ष सोडणाऱ्यांना गद्दारांना धडा शिकवण्यात येईल. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राऊतांच्या प्रचारासाठी घराघरात जाऊन मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला राकेश शिंदे, प्रताप शिंदे, रूमाताई देवळेकर, मानसी भोसले, संतोष चव्हाण, अजित गुजर, अनंत खैर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com