महावितरणची मार्चअखेर १११ टक्केची विक्रमी वसुली

महावितरणची मार्चअखेर १११ टक्केची विक्रमी वसुली

१० (टुडे पान १ साठी)

महावितरणची १११ टक्केची विक्रमी वसुली

कठोर पावलाचे चांगले परिणाम; १०० कोटी ३३ लाख वसूल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : महावितरण कंपनीने थकबाकीधारकांच्या विरोधात उचललेल्या कठोर पावलाचे चांगले परिणाम आले आहेत. ३१ मार्चअखेर जिल्ह्याला ९० कोटी १७ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. महावितरणच्या वसुली पथकाने १०० कोटी ३३ लाखांची विक्रमी वसुली केली आहे. १११.२७ टक्के ही वसुली पूर्ण झाल्याने वरिष्ठांकडून महावितरणचे कौतुक करण्यात आले.
वीजबिल वसुलीत रत्नागिरी जिल्हा काही वर्षांपूर्वी अग्रक्रमावर होता; मात्र, कोरोनानंतर थकबाकीचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे होते. थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी सुरू होताच वीजवसुलीला गती वाढून जिल्ह्यात तब्बल १११ टक्के वसुली झाली.
महावितरणकडून मागणीप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल देण्यात येत असले तरी ग्राहकांकडून ते वेळेवर भरले जात नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी वसुली मोहीम तीव्र केली जाते. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरण्याची सूचना केली जाते; मात्र, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा थेट वीजपुरवठाच खंडित केला जातो. ही कारवाई तीव्र झाल्यामुळेच विक्रमी वसुली झाली आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्याला ९० कोटी १७ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. महावितरणच्या वसुली पथकाने १०० कोटी ३३ लाखांची १११.२७ टक्के विक्रमी वसुली झाली आहे.
----------------------

* चिपळूण विभाग- ४२ कोटी ९४ लाखाची वसुली
* रत्नागिरी ३ विभाग- ३९ कोटी ५ लाखाची वसुली
* उच्चदाब वाहिनी- ४२ कोटी ४४ लाखाची वसुली
* लघुदाब वाहिनी- ५७ कोटी ८९ लाखाची वसुली
----------------
कोट
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात वसुलीची मोहीम तीव्र केली. त्यामुळे उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन वसुली करण्यात आली आहे. एकूण १११.२७ कोटींची वसुली पूर्ण झाली आहे. ग्राहकांनीही वेळेवर वीजबिले भरून सहाकार्य करावे आणि कारवाई टाळावी.
- स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com