आंब्यावरील थ्रीप्स रोगावर कृषी विद्यापीठात संशोधन

आंब्यावरील थ्रीप्स रोगावर कृषी विद्यापीठात संशोधन

२४ (टूडे १ साठी मेन)
(टीप- दोन बातम्या आहेत. शेजारी-शेजारी घ्याव्यात)


- rat४p२८.jpg-
P२४M७५२४६
मंडणगड ः थ्रीप्समुळे मोहोर काळा पडला आहे.
----------
आंब्यावरील थ्रीप्स रोगावर विद्यापीठात संशोधन

शिबिरातून जनजागृती ; अभ्यासाशिवाय फवारणी न करण्याचा सल्ला, उत्पादनात घट होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः हापूस आंब्यावर थ्रीप्स रोगाची लागण झाल्याने त्याचे विपरित परिणाम तालुक्यातील आंबा पिकावर होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात व्यापक जागृतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठ या रोगासंदर्भात संशोधन करत आहे. ज्यामुळे भविष्यात या रोगापासून होणार पिकाचे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे.

तालुक्यात पूर्णपणे आंब्याच्या उत्पन्नावर अवलंबून असणारे शेतकरी व सरासरी चार ते पाच झाडे असणारी शेतकरी असे परस्परविरोधी चित्र आहे. पिकासाठी वर्षभर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या अर्थकारणात या नगदी पिकांचा मोठा सहभाग आहे. अनेक आंबा बागायतदार करार पद्धतीने आपली झाडे व्यापाऱ्यांना विकत असल्याने त्यांनाही या समस्येची झळ सोसावी लागणार आहे. याबाबत कोकण कृषी विद्यापिठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. जालगांवकर यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्यावर थ्रीप्स रोगाची मोठी लागण झाली होती; मात्र उष्णता वाढल्यावर थ्रीप्स या रोगाची कीडीचा प्रार्दुभाव कमी कमी होत जातो. थ्रीप्स म्हणजे फूलकीड व ही अतिशय सुक्ष्म कीड आहे. झाडांची पाने, मोहर व फळावरही या रोगाचा प्रार्दुभाव झालेला दिसून येतो. ही कीड रस शोषून घेत असल्याने फळधारणा होत नाही. फूलकिडीवर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी स्वतःच्या मनाने दोन ते तीन कीटकनाशके एकत्रित करून फवारणी करतात. त्याचा दुष्परिणाम होतो. यावर कोकण कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. काही गावांमध्ये या विषयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शिबिरेही घेतली गेली आहेत. या रोगाचे निवारण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहेत.
-----
चौकट
जंगली झाडे राखणे गरजेचे

हापूसची लागवड करताना येथील वातावरणातील आजुबाजूची स्थानिक जंगली झाडे राखली जातील, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनचक्रात निसर्ग स्वतः हा समतोल राखतो. जंगली झाडांवरील कीडे हापूस आंब्यावरील कीटक व लहान कीडे मारून खातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रेस्टिसाईजची व्यवस्था निर्माण होते. हापूसवरून कीटके व कीड्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने ते कुठल्याही औषधाला दाद देत नाहीत. औषधाचे प्रमाण वाढवले तरीही त्यातूनही ते वाचतात व कृत्रिमपणे केलेल्या फवारणीमुळे जंगली झाडांवरील कीटक आपले रक्षण करू शकत नाहीत. ज्यांच्यासाठी फवारणी केली जाते त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही. फवारणीमुळे उपयुक्त असलेले मोठे कीटक मात्र मरून जातात.
------

(बातमी क्र. २)


- rat४p२९.jpg-
२४M७५२४७
हापूस कलमाला लगडलेले आंबे.
-------------

मंडणगडातील बागायतदार अडचणीत

मंडणगड, ता. ४ ः हंगामात झालेला अवकाळी पाऊस, थ्रीप्स रोगाची लागण व हमीभावाअभावी तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हापूस पिकावर तालुक्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर चालते. त्यासाठी वर्षभर मेहनत करणारे शेतकरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नव्वदच्या दशकात राज्य शासनाच्या मोफत फळबाग योजनेचा लाभ घेऊन तालुक्यातील हजारो एकर जमीन क्षेत्रावर हापूस लागवड झाली. यामुळे हापूसच्या उत्पादनात वाढ झाली. शेतकऱ्यांची आवक वाढली हे खरे असले तरी या निमित्ताने निसर्गचक्रात विशेषतः हापूसच्या लागवडीसाठी अन्य जंगली झाडे नष्ट करण्यात आली. त्याचे दुष्परिणाम थ्रीप्स रोगाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना यंदा अनुभवण्यास येत आहेत. तालुक्यातील समुद्री किनाऱ्यालगतचे गावांमध्ये या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून आली आहे. थ्रीप्समुळे फळे लहान असतानाच गळून पडत आहेत.
यंदा वेळास गावात जानेवारी महिन्यातच हापूस हंगामाला सुरवात झाली आहे; मात्र अवकाळीमुळे तालुक्यात सर्वत्रच आंब्याला दोनदा मोहोर आला. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे उत्तम दर्जाचे फळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे कठीण असतानाच विविध कारणांनी हापूस निर्यातही बरीच कमी झालेली दिसून आलेली आहे.
----------
कोट
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन बागेची पाहणी करून झाडांवर असलेला रोग थ्रीप्स आहे अथवा नाही याची खातरजमा करून योग्य उपाययोजनांकरिता शेतकऱ्यांना मदत करणार.
- सुप्रिया घोडके, तालुका कृषी अधिकारी.
---------
कोट
अवकाळीमुळे आंब्यास दुबार मोहोर धारणी झाली आहे. दुबार मोहोरधारणीबरोबरच थ्रीप्स या रोगाचे तालुक्यातील अनेक गावांतील झाडांवर लागण झालेली दिसून आली आहे. त्यामुळे फळधारणा होत असतानाच फळे झाडावरून गळून पडत असल्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
- विजय शिंदे, आंबा बागायतदार
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com