दामूअण्णासारखे ठामपणे आता कोण सांगणार?

दामूअण्णासारखे ठामपणे आता कोण सांगणार?

२४ (निवडणूक पानासाठी)

स्पंदन मतदात्याचे .............लोगो

इंट्रो
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते दामूअण्णा दाते रत्नागिरीत विश्रांतीसाठी आले होते. एका संध्याकाळी काहींना त्यांच्याशी बोलण्यासाठी निमंत्रण मिळाले. त्यात प्रस्तुत लेखकाचा समावेश होता. आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती होत्या. सुमारे अर्धा तास दामूअण्णांनी त्यांचे विचार मांडले. मग काही विचारायचे तर विचारा, असे म्हणाले.

---आ. ग. मते, रत्नागिरी

---------
दामूअण्णासारखे ठामपणे आता कोण सांगणार?

तो काळ भाजपच्या उदयाचा होता. आज भाजपचे राजकारण करतोय त्याच्या पाउलखुणा दिसू लागल्या होत्या. महाराष्ट्रात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडे भाजपची सुत्रे नुकतीच आली होती आणि सत्तेसाठी काहीही जुगाड करायची त्यांची तयारी होती. ही भेट झाली त्याच्या आधी आठ दिवस उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाजपक्ष फोडून कल्याणसिंह सरकार वाचले होते. या पार्श्वभूमीवर दामूअण्णांना थेट प्रश्न विचारला होता की, महाजन-मुंडे यांच्या राजकारणाचे आणि कल्याणसिंह यांच्या कृतीचे संघ समर्थन करतो का? दामूअण्णा स्पष्टपणे नाही म्हणाले; पण ते पुढे असेही म्हणाले की, हे प्रतिक्रियावादी राजकारण आहे. दुसरे पक्ष म्हणजे काँग्रेस जशी वागते त्याला उत्तर म्हणून आम्ही असे वागतो; पण हे दीर्घकाळाचे धोरण नाही आणि योग्यही नाही. या मुलाखतीला आता पाव शतकाचा काळ लोटला. या तथाकथित प्रतिक्रियावादी राजकारणाची सुरवात करणारे महाजन, मुंडे, कल्याणसिंह आता हयात नाहीत. या नेत्यांना तत्त्वनिष्ठेचा सन्मान द्यावा इतक्या खालच्या पातळीला सध्याचे राजकारण गेले आहे. आता ते साम, दाम, दंड, भेद याच्या पलीकडे सरकारी यंत्रणांचा वापर करून सत्ता आणतात. निवडणुका हरले तरी दुसरे पक्ष पळवून सत्ता मिळवतात. आता हे राजकारण काळाची तात्पुरती गरज म्हणून नुसते प्रतिक्रियावादी राहिलेले नाही तर सर्वकाळ आमचीच सत्ता, अशी परमेश्वरी सनद मिळाल्याच्या अभिनिवेशात जोरात सुरू आहे. आज दामूअण्णा पण नाहीत आणि दीर्घकाळात हे योग्य नाही, असे ठामपणे म्हणणारा कादाचित संघातही कोणी नाही.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com