भाऊ कार्ले यांना पुरस्कार

भाऊ कार्ले यांना पुरस्कार

३२ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)


-rat४p१५.jpg -
२४M७५२१५
भाऊ कार्ले
---------

भाऊ कार्ले यांना पुरस्कार

चिपळूण : येथील हौशी नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना भावना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा सन २०२४ साठी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला आहे. कार्ले हे १९८२ पासून हौशी रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी विविध राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे ३५ वर्षे आयोजन केले असून, १९९०च्या दशकात राज्य नाट्यस्पर्धांचे समीक्षण लिहिले असून, स्वतः १९ एकांकिका व एक नाटकाचे लिखाण केले असून, ते सर्व सेन्सॉर संमत आहे. त्यांना विविध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धामध्ये लेखन, दिग्दर्शन व अभिनयाची सुमारे २९० पारितोषिके व दहा राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल त्यांचे रंगकर्मी ग्रुप व सर्वस्तरीय नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, या यशाचे सर्व श्रेय ते रंगकर्मी व त्यांच्या पत्नी रूपा कार्ले, मुलगी डॉ. गायत्री साने व मुलगा वेदांत यांना नम्रपणे समर्पित करत आहेत.
-------

योगासन स्पर्धेत
स्पंदन धामणेचे यश

पावस ः चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या १०व्या युथ गेम्स स्पर्धेमध्ये साडवली येथील स्पंदन धामणे याने क्लासिकल योगासन स्पर्धा या प्रकारात १४ वर्षांखालील मुले या गटात पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धेसाठी त्याला चिपळूण येथील पाग व्यायामशाळेचे योग मार्गदर्शक रणवीर सावंत, देवरूख येथील डॉ. कविता फास्के यांचे मार्गदर्शन लाभले.
------

‘ब्रेन डेव्हलपमेंट’मध्ये
कोळबांद्रे-कुंभारवाडी शाळेचे यश

गावतळे ः बीडीएस परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. बीडीएस परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. या परीक्षेमध्ये दापोली तालुक्यातील कोळबांद्रे-कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. परीक्षेमध्ये ५ विद्यार्थी बसले होते. दुसरीमध्ये शरयू पादड व तिसरीमध्ये वेद कडवईकर, रूद्र बेर्डे, रूदही गौरत यांनी यश संपादन केले. वैशिष्ट्य म्हणजे शाळा लहान पटाची असून, एकशिक्षकी आहे. शिक्षक मंगेश कडवईकर यांनी कधीही सुट्टी न घेता विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.
------------
काँग्रेस जिल्हाध्यक्ष लाडांकडे
निवडणुकीची जबाबदारी

रत्नागिरी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची सर्व जबाबदारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड यांच्याकडे दिली आहे. जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावयाचा आहे, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेवेळी दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांनी दिली. या संदर्भात कांबळे यांनी पक्षाचे नेते व कोकणचे प्रभारी नसीम खान यांचीही भेट घेऊन त्यांना रत्नागिरीतील परिस्थितीची माहिती दिली.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com